TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

फडणवीस मोदींच्या मंत्रिमंडळात जाणार? पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, ‘महाराष्ट्राला त्यांची गरज’

केंद्रीय राजकारणात प्रवेशाच्या चर्चांना पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर; ‘आरएसएस आणि मोदींमध्ये चर्चा झाल्याशिवाय असा निर्णय शक्य नाही’

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी फडणवीस केंद्रीय राजकारणात जाणार असल्याचा दावा केल्यानंतर या चर्चांना अधिक जोर आला. आता भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आणि प्रभावशाली नेते आहेत. मात्र, सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राला त्यांची सर्वाधिक गरज आहे, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे फडणवीस यांच्या दिल्लीतील संभाव्य प्रवेशाच्या चर्चांवर पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगली आहे.

पंकजा मुंडे यांनी गुरुवारी कोल्हापूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस केंद्रात जाणार का, याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाल्याशिवाय असा निर्णय होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  ISROची ऐतिहासिक भरारी! GSLV-F17च्या माध्यमातून EOS-05 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

फडणवीस जिथे आहेत, तिथे महाराष्ट्राला त्यांची गरज’

“देवेंद्र फडणवीस हे अत्यंत प्रभावी आणि अभ्यासू नेते आहेत. मी त्यांच्यासोबत २५ वर्षे काम केले आहे. आज ते ज्या पदावर आहेत, त्याहून अधिक मोठे व्हावेत अशी प्रार्थना आम्ही नक्कीच करू शकतो. मात्र, सध्या ते जिथे आहेत, तिथे त्यांची महाराष्ट्राला अत्यंत आवश्यकता आहे,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रीय राजकारणातील संभाव्य प्रवेशाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिल्लीत आणून उपपंतप्रधानपद देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा दावा केला होता. संघ आणि भाजपमधील काही प्रमुख व्यक्ती फडणवीस यांना केंद्रीय राजकारणात मोठी जबाबदारी देण्याच्या तयारीत असल्याचेही राऊत यांनी म्हटले होते.

मात्र, या दाव्याला भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीही आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या दिल्लीवारीच्या चर्चांना सध्या पंकजा मुंडेंच्या वक्तव्यामुळे नवा राजकीय रंग मिळाला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button