दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक बदल

पिंपरी | श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध मार्गांवर वाहतूक बदल आणि प्रवेशबंदी लागू केली आहे.
४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतुकीमध्ये हे बदल करण्यात येणार आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
चऱ्होली, कात्रज? चऱ्होली फाटा, कात्रज? तसेच साई चौक, जमातानी चौक, नव महाराष्ट्र चौक आदी ठिकाणी विविध दिशेने जाणाऱ्या वाहनांवर प्रवेशबंदी करण्यात आली असून पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
भोसरी वाहतूक विभागात पुणे नाशिक महामार्गावरील लांडेवाडी येथील पीएमटी बसथांब्यापासून भोसरी ओव्हर ब्रिजपर्यंतच्या मार्गावर वाहतूक बदल करण्यात आला आहे. तसेच दिघी परिसरातील दिघी आळंदी रोडवरही आवश्यकतेनुसार प्रवेशबंदी राहणार आहे.
हेही वाचा
नेपाळमध्ये जलप्रलयाचा महाविनाश: मृतांचा आकडा १,२५९ वर, ५ हजारांहून अधिक बेपत्ता
चिखली विभागात कृष्णानगर, नेवाळवस्ती कॉर्नर, मोशी चौक आणि वाय पॉईंट कुंडेवस्ती परिसरातील काही मार्गांवर वाहतुकीस मनाई करण्यात आली असून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.
तळवडे विभागात काळाखडक चौकातून फिनिक्स मॉलकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी राहणार आहे. तसेच जाधववाडी व बालाजी चौक परिसरातून फिनिक्स मॉलकडे जाणाऱ्या वाहनांसाठीही पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
देहूरोड विभागात पंढरवाडा, साईराज चौक, भैरवनाथ चौक आणि कासारवाडी-पाटील चौक परिसरातील काही मार्गांवर वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच उत्सवाच्या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.





