Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक; ‘12 सप्टेंबरला मुंबईकडे जाणार’

सरकारवर आंदोलन मोडून काढण्याचा आरोप; मसुद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी, विखे पाटील-सावंत यांच्यावरही जोरदार टीका

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. सरकारकडून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संजय सावंत यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच 12 सप्टेंबर रोजी मुंबईकडे जाणार असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

गेल्या तीन वर्षांत जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक चर्चेसाठी आपल्याकडे आले नसल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला. सरकारने मसुदा पाठवला आहे; मात्र केवळ मसुदा पाठवून उपयोग नाही, तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा –  अप्पू घरच्या मुदतवाढीपूर्वी सुरक्षिततेची खात्री करा : भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे

आंदोलन मोडून काढण्याचा डाव सुरू असल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावा, तसेच प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पुढे न्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, कोल्हापूर आणि सातारा संस्थानांच्या संदर्भातील जीआर देण्याची मागणी त्यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपण मागे हटणार नसल्याचे सांगत त्यांनी 12 सप्टेंबरच्या मुंबई आंदोलनाचा पुनरुच्चार केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button