TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘संजय राऊत काय बोलतात यापेक्षा कोणावर बोलतात हे महत्त्वाचं’; चित्रा वाघ यांचा राऊतांवर जोरदार पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील टीकेला चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर; पत्राचाळ प्रकरणाचा दाखला देत राऊतांवर निशाणा

बदलापूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “संजय राऊत काय बोलतात याला महत्त्व नाही, तर ते कोणावर बोलत आहेत हे महत्त्वाचं आहे,” असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला. बदलापूरमध्ये आयोजित भाजपच्या संघटनात्मक बैठकीनंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केल्याबाबत बोलताना चित्रा वाघ यांनी राऊतांच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख केला. “103 दिवस जेलमध्ये राहिलेल्यांनी नरेंद्र मोदींवर बोलावं, हे हास्यास्पद आहे,” असं म्हणत त्यांनी राऊतांवर निशाणा साधला.

‘संजय राऊत निवडून आलेले नव्हे, निवडून दिलेले खासदार’

संजय राऊत हे निवडून आलेले खासदार नसून निवडून दिलेले खासदार असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली. जगातील विविध देशांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला जात असल्याचं सांगत त्यांनी राऊतांच्या मोदींवरील टीकेवर प्रश्न उपस्थित केला.

हेही वाचा –  मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक; ‘12 सप्टेंबरला मुंबईकडे जाणार’

पत्राचाळ प्रकरणाचा दाखला देत टीका

चित्रा वाघ यांनी यावेळी पत्राचाळ प्रकरणाचाही उल्लेख केला. राऊत तुरुंगात गेले होते, मात्र ते राष्ट्रभक्तीसाठी नव्हते, असा दावा त्यांनी केला. मराठी लोकांच्या घरांचा आणि फसवणुकीचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी राऊतांवर गंभीर आरोप केले.

शिवतीर्थ राड्यावरही चित्रा वाघांची प्रतिक्रिया

मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवरही चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मुंबईतील खड्डे बुजवण्याचं आव्हान दिलं होतं. काम झाल्यास कपाळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून फिरेन, असं देशपांडे म्हणाले होते. या वक्तव्यावरही चित्रा वाघ यांनी पलटवार केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button