भावंड नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी व्हीटीपी रिअल्टीचा खास उपक्रम
सलग दुसऱ्या वर्षी विशेष रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण. मात्र, प्रत्येकालाच हा सण भावंडांसोबत साजरा करता येतो असे नाही. ही बाब लक्षात घेऊन व्हीटीपी रिअल्टीने भावंड नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी सलग दुसऱ्या वर्षी विशेष रक्षाबंधन उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमात कंपनीतील ३५० हून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभागी होत सहकाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरे केले.

व्हीटीपी उद्योग समूहात सुमारे १,३०० कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी बहिण नसलेल्या ३०० पुरुष कर्मचाऱ्यांची आणि भाऊ नसलेल्या ६४ महिला कर्मचाऱ्यांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली. महिला कर्मचाऱ्यांनी पुरुष सहकाऱ्यांना राखी बांधली आणि एकमेकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

या वेळी व्हीटीपी ग्रुपचे अध्यक्ष आणि संस्थापक विलासकुमार थानमल पालरेशा, वरिष्ठ व्यवस्थापनातील अधिकारी आणि मनुष्यबळ विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला साध्वी ईशदर्शना यांनी द्रुकश्राव्य यंत्रणेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करताना कामाच्या ठिकाणीही परस्पर सन्मान, सहकार्य आणि आपुलकीची भावना जपण्याचे आवाहन केले.
हेही वाचा – ‘मुंबईवर मराठ्यांचा महाप्रलय येणार’; जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, ‘मागे हटणार नाही’

काही कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच राखीचा अनुभव
या उपक्रमातील काही कर्मचाऱ्यांसाठी रक्षाबंधनाचा अनुभव विशेष ठरला. ज्यांनी यापूर्वी कधीही राखी बांधली नव्हती किंवा बांधून घेतली नव्हती, अशा काही कर्मचाऱ्यांनी यंदा पहिल्यांदाच हा सण अनुभवला. त्यामुळे कार्यक्रमात भावनिक वातावरण निर्माण झाले.
विशेष म्हणजे गेल्या वर्षी ज्या महिला कर्मचाऱ्याने आपल्या पुरुष सहकाऱ्याला राखी बांधली होती, तिने यंदाही त्याच सहकाऱ्याला राखी बांधली. या छोट्याशा कृतीतून सहकाऱ्यांमधील विश्वास आणि आपुलकीचे नाते अधिक दृढ होत असल्याचे दिसून आले.
या उपक्रमामुळे रक्षाबंधन हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता कर्मचाऱ्यांना एकमेकांशी जोडणारा अनुभव ठरला. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांमध्ये कुटुंबासारखी आपुलकी आणि परस्पर विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
व्हीटीपी समूहाच्या ग्रुप हेड ऑफ एचआर हर्षा पालांडे म्हणाल्या, “भावंड नसलेल्या कर्मचाऱ्यांनाही रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपुलकीचे नाते अनुभवता यावे, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. यंदा काही कर्मचाऱ्यांनी प्रथमच रक्षाबंधन साजरे केले. तसेच गेल्या वर्षी या उपक्रमातून निर्माण झालेले बंध यंदाही कायम राहिले. त्यामुळे हा उपक्रम आमच्यासाठी अधिक विशेष आणि समाधान देणारा ठरला.”

व्हीटीपी रिअल्टीविषयी
व्हीटीपी रिअल्टी ही पुण्यातील नामांकित रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक आहे. तब्बल चार दशकांपासून पुण्याच्या बांधकाम क्षेत्रात मोलाचे योगदान देत, संस्थेने आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन भंडारी यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने सुमारे ९० कोटी रुपयांच्या व्यवसायातून ४,००० कोटी रुपयांहून अधिक व्यवसायाचा टप्पा गाठला आहे.
गुणवत्ता, आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान, ग्राहककेंद्री सेवा आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर कंपनीचा भर आहे. तंत्रज्ञानाधारित प्रणालींच्या माध्यमातून कामकाज अधिक पारदर्शक करण्याबरोबरच पुण्यातील विविध भागांत प्रकल्पांचा विस्तार करण्यावर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे.
व्यावसायिक प्रगतीसोबतच कर्मचाऱ्यांमधील आपुलकी, विश्वास आणि सकारात्मक कार्यसंस्कृतीला प्रोत्साहन देणे, हा व्हीटीपी रिअल्टीच्या या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे.





