उत्तर प्रदेशची ४ भागांत विभागणी होणार; मंत्री ओमप्रकाश राजभर यांचा खळबळजनक दावा, मोदींशी चर्चा झाल्याचे वक्तव्य

देवरिया येथे आयोजित ‘सामाजिक समरसता महारॅली’ला संबोधित करताना राजभर यांनी २७ टक्के आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “२७ टक्के आरक्षणाबाबत माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. त्यावर पंतप्रधान म्हणाले की, ‘ओमप्रकाशजी, तुमच्या मुद्द्यात तथ्य आहे; पण काही घटक याला विरोध करत आहेत.’ यावर तोडगा विचारला असता पंतप्रधानांनी, ‘आधी जातीय जनगणना होऊ द्या, एकदा जनगणना पूर्ण झाली की राज्याच्या विभाजनाचा मार्ग सुकर होईल,’ असे सांगितले.”
हेही वाचा
‘दगडूशेठ’ च्या वतीने गणेशोत्सवात ६ हजार भाविकांना आरोग्यसेवा
ओमप्रकाश राजभर ने देवरिया में आयोजित सुभासपा की सामाजिक समरसता रैली में उत्तर प्रदेश के बंटवारे को लेकर बड़ा बयान दिया। उन्होंने दावा किया कि आने वाले समय में यूपी चार हिस्सों में बंट सकता है। साथ ही कहा कि अगर पूर्वांचल अलग राज्य बना तो वहां पहला मुख्यमंत्री राजभर समाज का बेटा होगा।
राजभर ने जातिगत जनगणना और पिछड़े वर्ग के आरक्षण में हिस्सेदारी का मुद्दा भी उठाया। उन्होंने कहा कि जातिवार जनगणना के बाद आरक्षण में वंचित वर्गों की हिस्सेदारी तय करने की दिशा में आगे बढ़ना चाहिए।
#OmPrakashRajbhar #OPRajbhar #Purvanchal #UttarPradesh #UPPolitics #CasteCensus #जातिगतजनगणना #पूर्वांचल #उत्तरप्रदेश #राजभर
— Arun (आज़ाद) Chahal 🇮🇳 (@ArunAzadchahal) September 21, 2026
आपल्या कार्यकर्त्यांना आणि तरुणांना धीर देताना राजभर म्हणाले की, समाजवादी पक्ष (SP), बहुजन समाज पक्ष (BSP) किंवा काँग्रेसच्या पोकळ आश्वासनांना बळी पडू नका. “उत्तर प्रदेशचे चार तुकडे होऊन जेव्हा वेगळे ‘पूर्वांचल’ राज्य अस्तित्वात येईल, तेव्हा राजभर समाजाचाच सुपुत्र त्या राज्याचा मुख्यमंत्री होईल. हे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून काम करा आणि इतर पक्षांच्या नादी लागू नका,” असे आवाहन त्यांनी केले. पूर्व उत्तर प्रदेशात राजभर समाजाचे मोठे राजकीय वजन मानले जाते.
विभाजनाच्या जुन्या मागणीला पुन्हा हवा
उत्तर प्रदेशच्या विभाजनाचा मुद्दा मागील दोन दशकांपासून वेळोवेळी चर्चेत येत आहे. यापूर्वी २०१२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनीही उत्तर प्रदेशचे पूर्वांचल, पश्चिमांचल, बुंदेलखंड आणि अवध अशा चार स्वतंत्र राज्यांत विभाजन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. आता भाजपच्याच मित्रपक्षाचे मंत्री असलेल्या ओमप्रकाश राजभर यांनी थेट पंतप्रधानांचा हवाला देत विभाजनाचा मुद्दा छेडल्याने आगामी काळात यावरून मोठे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.





