TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गणेशोत्सवातील महाप्रसादासाठी स्वतंत्र नवा नियम नाही; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे स्पष्टीकरण
सण-उत्सव असो वा अन्य प्रसंग, अन्न सुरक्षा नियमांचे पालन सर्वांसाठी बंधनकारक; ३,१०० हून अधिक आस्थापनांची तपासणी, नियमभंगावर कारवाई

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसाद आणि भंडाऱ्यांसाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नवा नियम लागू केल्याची चर्चा सुरू असताना, FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. गणेशोत्सव, ईद किंवा इतर कोणत्याही सणासाठी स्वतंत्र अथवा नवे नियम लागू करण्यात आलेले नाहीत. मात्र, अन्नपदार्थ तयार करणे आणि वितरण करणाऱ्या सर्व संबंधितांनी यापूर्वीपासून लागू असलेल्या अन्न सुरक्षा नियमांचे आणि मानकांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




