ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बंधुभाव, मानवता आणि शांततेचा संदेश देत ईद-ए-मिलाद उत्साहात

पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य मिरवणूक; विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान

पिंपरी- चिंचवड : बंधुभाव, मानवता आणि शांततेचा संदेश देत जुलूस-ए-मोहम्मदिया कमिटी ट्रस्ट, पिंपरी-चिंचवडच्या वतीने हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद-ए-मिलाद उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. शहराच्या विविध भागांतून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. अनेक ठिकाणी हिंदू-मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीचे उत्स्फूर्त स्वागत करून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविले.

पारंपरिक धार्मिक वातावरणाला आधुनिकतेची जोड देत काढण्यात आलेल्या मिरवणुकीत चिमुकल्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते. निगडी, ओटा स्कीम, रूपीनगर, आकुर्डी, चिंचवड, कुदळवाडी, चिखली, जाधववाडी, थरकवाडी, पॉवर वस्ती, लांडेवाडी, भोसरी, बालाजीनगर, नेहरूनगर, संत तुकारामनगर, मोरवाडी, वाकड, काळाखडक, थेरगाव, पवनानगर, काळेवाडी, पिंपरी कॅम्प, दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी आदी परिसरांतून मिरवणुका काढण्यात आल्या.

सुन्नी उलेमा कौन्सिलच्या धर्मगुरूंसमवेत निघालेल्या या मिरवणुका पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र आल्या. येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली. विविध भागांतून आलेल्या भाविकांनी आकर्षक देखावे सादर केले. मिरवणुकीदरम्यान अनेक ठिकाणी पाणी, सरबत आणि मिठाईचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा –  गणेशोत्सवातील महाप्रसादासाठी स्वतंत्र नवा नियम नाही; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचे स्पष्टीकरण

यावेळी उत्तर प्रदेशातील प्रमुख प्रवचनकार हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती मुख्तारूल हसन (बगदादी साहेब किबला, शेखुल हदीस, दारुल हक्क) यांचे प्रवचन झाले. त्यांनी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन करत मानवता, बंधुभाव, शांतता आणि परस्पर सन्मानाची शिकवण समाजाने आचरणात आणण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने झाली.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान

पिंपरी-चिंचवड शहराच्या सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, माजी महापौर आझम पानसरे, व्ही. एम. कबीर, शकरुल्ला पठाण, झिशान सय्यद, ताजुद्दीन तांबोळी, जुलूस-ए-मोहम्मदिया कमिटी ट्रस्ट, जब्बार शेख, डॉ. जावेद शेख, अहमद हसन खान, हाजी मुस्तफा खान आणि गुलाम अली भालदार यांचा समावेश होता. यावेळी सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पिंपरी-चिंचवड जुलूस समितीचे अध्यक्ष रमजान अत्तार, उपाध्यक्ष नासीर शेख, सचिव हाजी अकबर मुल्ला, खजिनदार मुश्ताक अहमद शेख यांच्यासह सलीम मेमन, युसूफ रज्जाक कुरेशी, माजी अध्यक्ष युसूफ कुरेशी, झिशान सय्यद, हाजी गुलाम रसूल, शहाजी अत्तार, हबीब शेख, फारूक इनामदार, माजी शिक्षण सभापती फजल शेख, शहाबुद्दीन शेख, हाजी इद्रीस मेमन, अजहर खान, शकरुल्ला पठाण, कमरुद्दीन तांबोळी, गुलामगौस सिद्धिकी, वाहीद कुरेशी, याकूब खान, नजीर वाघू, हजरत पटेल आणि जाकीर शेख यांनी सहभाग घेतला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button