ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

पुणे इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन

पुणे | डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यासोबत निर्माण होणारे सायबर धोके लक्षात घेऊन पुणे इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. क्विक हील फाउंडेशन यांच्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या अभियानांतर्गत आणि एमआयटी एसीएससी, आळंदी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

विद्यार्थ्यांना डिजिटल जगातील संभाव्य धोके समजावून सांगणे, ऑनलाइन खात्यांची सुरक्षितता वाढविणे आणि सुरक्षित व जबाबदार डिजिटल नागरिक घडविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. ‘माझा डेटा, माझी जबाबदारी’ या संदेशातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या डिजिटल माहितीचे संरक्षण करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.

सत्रामध्ये विद्यार्थ्यांना द्वि-घटक प्रमाणीकरण, डिजिटल पाऊलखुणा आणि सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. ऑनलाइन खात्यांची सुरक्षा वाढविण्यासाठी द्वि-घटक प्रमाणीकरणाचा वापर कसा करावा, इंटरनेटवर शेअर केलेली माहिती भविष्यात डिजिटल पाऊलखुणा म्हणून कशी राहू शकते आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर कसा टाळता येतो, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

विषय अधिक प्रभावीपणे समजण्यासाठी प्रत्यक्ष सायबर गुन्ह्यांवर आधारित प्रकरणांचा अभ्यास विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आला. या उदाहरणांद्वारे सायबर फसवणुकीच्या घटना कशा घडतात, त्यातील धोक्याची चिन्हे कशी ओळखायची आणि अशा घटनांपासून स्वतःचे संरक्षण कसे करायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

हेही वाचा

श्री दादा महाराज नाटेकर विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती सत्र उत्साहात संपन्न

या जनजागृती सत्राचे मार्गदर्शन एमआयटी एसीएससी, आळंदी येथील सायबर वॉरियर टीममधील:

– ओम जेधे – सायबर वॉरियर
– मधुरा भिलारे – सायबर वॉरियर

यांनी केले. संवादात्मक चर्चा, प्रकरणांचा अभ्यास आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेण्यात आला.

या उपक्रमास पुणे इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका मा. जयश्री कदम मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

हा उपक्रम क्विक हील फाउंडेशनच्या अध्यक्षा मा. सौ. अनुपमा काटकर मॅडम यांच्या प्रेरणेतून आणि एमआयटी एसीएससी, आळंदीचे प्राध्यापक समन्वयक (फॅकल्टी कोऑर्डिनेटर) मा. श्री. अमित तळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

विद्यार्थ्यांनी सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी डिजिटल माध्यमांचा सुरक्षित व जबाबदार वापर करण्याचा तसेच सायबर धोक्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाय अंगीकारण्याचा निर्धार व्यक्त केला.

सुरक्षित डिजिटल भविष्यासाठी सजग नागरिक घडविणे हेच या उपक्रमाचे प्रमुख ध्येय आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button