TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘सार्वजनिक सेवा हेच माझं कर्तव्य’; तुकाराम मुंढेंचा कामाप्रती निर्धार, ‘मी नाही तर मग कोण?’

बदली आणि दबावाची पर्वा न करता काम करण्याच्या भूमिकेवर तुकाराम मुंढे ठाम

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे आपल्या बेधडक आणि निडर कार्यशैलीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सार्वजनिक सेवेत काम करताना अनेक अडचणी आणि आव्हानांचा सामना करावा लागत असला, तरी आपल्या भूमिकेवर ठाम राहून काम करत असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले. मित्रांकडून अनेकदा ‘सोडून दे’ असा सल्ला मिळतो; मात्र सार्वजनिक सेवेत असल्याने आपले काम करणे हा आपला सामाजिक करार असल्याचे मुंढे यांनी सांगितले.

सरकारमधील मंत्र्यांसोबतचे संबंध आणि आपल्या कामामुळे सरकारमधील काही लोक असुरक्षित आहेत का, असा प्रश्न तुकाराम मुंढे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

“मला माहीत नाही. पण मी माझ्या भूमिकांबाबत एकदम क्लिअर आहे. मी कोणालाही असुरक्षित करत नाही. मी फक्त माझ्या भूमिकेकडे पाहतो,” असे मुंढे यांनी सांगितले.

आपल्या कामाच्या पद्धतीमुळे अनेकदा मित्र आणि बॅचमेट्स आपल्याला सावध करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर FSSAIची मोठी कारवाई

“माझे बॅचमेट्स, माझे मित्र अनेकदा म्हणतात की सोडून दे ना. ठेका घेऊन ठेवला आहे का? माझं त्यांना उत्तर असतं की, हो. ठेका घेऊन ठेवला आहे,” असे मुंढे म्हणाले.

सार्वजनिक सेवेत असल्यामुळे प्रामाणिकपणे काम करणे हा आपला ‘सोशल कॉन्ट्रॅक्ट’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या कार्यशैलीमुळे यंत्रणा अस्थिर होते, त्यामुळे एका पदावर किंवा ठिकाणी दीर्घकाळ काम करण्याची संधी मिळत नाही, असे मित्रांचे म्हणणे असल्याचे मुंढे यांनी सांगितले. याचा परिणाम कुटुंबालाही सहन करावा लागतो, हे मान्य करतानाच त्यांनी आपल्या भूमिकेत बदल न करण्याचे कारण स्पष्ट केले.

“जर मी नाही, तर मग कोण? जर मी करू शकत नसेन, मी एखाद्या खुर्चीवर, पदावर असूनही जर हे करू शकत नसेन, तर हे कोणी केलं पाहिजे?” असा सवाल ते स्वतःला विचारत असल्याचे त्यांनी सांगितले.

तुकाराम मुंढे यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे त्यांची कार्यशैली आणि सार्वजनिक सेवेकडे पाहण्याचा दृष्टिकोन पुन्हा चर्चेत आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button