TOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

अमेरिकेत विमान समुद्रात कोसळले; एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सहल संपवून घरी परतताना काळाचा घाला; १६ वर्षीय मुलासह दोन लहान मुलांचाही मृतांमध्ये समावेश

मिसिसिपी : अमेरिकेतील मिसिसिपीच्या समुद्रकिनाऱ्याजवळ झालेल्या विमान अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी (ता. २४) त्यांचे छोटे विमान समुद्रात कोसळले. सहल संपवून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अपघातात ब्रेंट स्टोक्स (वय ५०), त्यांचा मुलगा हंटर स्टोक्स (१६), ब्रेंट यांची बहीण आर्लिन नॉक्स, तिचे पती मायकेल नॉक्स आणि त्यांची दोन मुले चार्ल्स होल्डन नॉक्स (१२) व ट्रुएट नॉक्स (१०) यांचा मृत्यू झाला. हे सर्वजण फ्लोरिडा राज्यातील फोर्ट मायर्स येथील रहिवासी होते. लुईझियाना येथे सहलीसाठी गेलेले हे कुटुंब विमानाने घरी परतत होते. ब्रेंट स्टोक्स हे विमान चालवत होते.

हॉर्न आयलंडजवळ विमान कोसळले

मिळालेल्या माहितीनुसार, हे सेसना २१० विमान प्रवासादरम्यान समुद्रात कोसळले. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या माहितीनुसार, दुपारी सुमारे ३.४५ वाजण्याच्या सुमारास विमानाशी संपर्क तुटला. विमान वेगाने खाली येत असल्याची नोंदही करण्यात आली होती. त्यानंतर हॉर्न आयलंडच्या ईशान्य दिशेला विमान समुद्रात कोसळले.

हेही वाचा –  रावेतमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प होऊ देणार नाही : अण्णासाहेब बनसोडे

दोन तासांनंतर विमानाचे अवशेष आढळले

अपघाताची माहिती मिळताच अमेरिकेच्या तटरक्षक दलाने शोधमोहीम सुरू केली. सुमारे दोन तासांनंतर विमानाचे अवशेष आढळले. सुरुवातीला प्रवाशांचा शोध लागला नव्हता. त्यानंतर मिसिसिपीच्या सागरी विभागाने रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू ठेवले. अखेर विमानाच्या मुख्य भागात सहाही जणांचे मृतदेह आढळले.

या दुर्घटनेबद्दल मिसिसिपीच्या सागरी विभागाचे अधिकारी जो स्प्रॅगिन्स यांनी दुःख व्यक्त केले. शोध आणि बचावकार्यात सहभागी पथकांनी पूर्ण जबाबदारीने काम केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेची फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) या यंत्रणांनी तपास सुरू केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group