आर.के.एल. गॅलेक्सीच्या हंसिका नेदनुरवारचे ‘उडान २०२६’मध्ये सुवर्णयश नाट्य वाचन स्पर्धेत पटकावले दोन मानाचे पुरस्कार

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
येथील जी.के. गुरुकुल आयोजित ‘उडान २०२६’ या राज्यस्तरीय नाट्य वाचन स्पर्धा आर.के.एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी हंसिका नेदनुरवार हिने आपल्या अप्रतिम कलागुणांच्या जोरावर दुहेरी मुकुट पटकावत शाळेचा गौरव द्विगुणीत केला आहे.
हंसिकाने आपल्या उत्कृष्ट नाट्यवाचन आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची व परीक्षकांची मने जिंकली. तिच्या प्रभावी अभिव्यक्तीची आणि संवादाची दखल घेत परीक्षकांनी तिला ‘सर्वोत्कृष्ट नाट्यवाचक’ आणि ‘सर्वोत्कृष्ट शब्दोच्चार’ हे दोन विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केले. तिची मेहनत, सातत्यपूर्ण सराव, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कलेविषयीची जिद्द यामुळेच हे यश शक्य झाले.
शाळा नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करते आणि त्यांना मोठी व्यासपीठे उपलब्ध करून देते. याच प्रेरणेतून, पुण्यातील ‘आर. के. एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल’च्या दोन होतकरू विद्यार्थ्यांनी मलेशियात पार पडलेल्या ‘आंतरराष्ट्रीय सिलंबम (लाठीकाठी) स्पर्धा २०२६’ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
हेही वाचा – तुकाराम मुंढेंना २००७ मध्ये मिळालं होतं ‘लाल शाईचं’ धमकीचं पत्र; म्हणाले, ‘माघार घ्या, नाहीतर रक्त सांडेल’

या स्पर्धेत वेदार्थ तापकीर याने उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर पोरुथल (काठीची लढत) प्रकारात रौप्य पदक, तर ओपन वेपन प्रकारात कांस्य पदक पटकावले. या दोन्ही विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा दिमाखात फडकवून शाळा, पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
शाळेच्या व्यवस्थापनाकडून, शिक्षकांकडून आणि पालकांकडून हंसिकावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
”हंसिकाचे हे यश आर.के.एल. गॅलेक्सी परिवारासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. केवळ अभ्यासातच नव्हे, तर सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातही आमचे विद्यार्थी अव्वल ठरत आहेत. तिची ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा देणारी ठरेल.”
— डॉ. पुष्कर चौबे (सीईओ, आर.के.एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल)
“हंसिकाने आपल्या कठोर परिश्रमाने आणि सातत्याने हे यश मिळवले आहे. तिचे कलागुण आणि व्यासपीठावरील आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. भविष्यात ती कला क्षेत्रात नवनवीन शिखरे पादाक्रांत करेल, यात शंका नाही.”
— मिस मित्तल शहा (सीओओ, आर.के.एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल)





