ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीत ‘दीक्षारंभ’ इंडक्शन प्रोग्राम; मान्यवरांची उपस्थिती

पिंपरी-चिंचवड | आकुर्डी येथील डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी ‘दीक्षारंभ’ इंडक्शन प्रोग्राम २०२६-२७चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २१ आणि २२ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला असून, विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या नव्या शैक्षणिक प्रवासाची सकारात्मक आणि प्रेरणादायी सुरुवात व्हावी, तसेच त्यांना शिक्षणासोबतच सामाजिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक विकासासाठी मार्गदर्शन मिळावे, हा या इंडक्शन प्रोग्रामचा प्रमुख उद्देश आहे. विद्यापीठाच्या ‘Think | Thrive | Transform’ या ध्येयवाक्याला सुसंगत अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना नव्या संधी आणि आव्हानांची ओळख करून दिली जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी पद्मविभूषण डॉ. सोनल मानसिंग यांची प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती राहणार आहे. त्या राज्यसभा माजी सदस्य (२०१८-२०२४) असून, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र (IGNCA), नवी दिल्लीच्या विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. कला, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

हेही वाचा

कुर्ल्यात घरावर क्रेन कोसळली; १० हून अधिक जण जखमी!

तसेच EKA Mobility, Puneचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा IAS अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आणि Central GST & Customs, Pune Zoneचे Chief Commissioner श्री. नीरज कंसल हे देखील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या मान्यवरांच्या संवादातून विद्यार्थ्यांना नेतृत्वगुण, नवोन्मेष, उद्योजकता, प्रशासन, उद्योग क्षेत्र तसेच सामाजिक जबाबदारी याबाबत मौल्यवान मार्गदर्शन मिळणार आहे. शिक्षण केवळ पदवी मिळविण्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांनी बदलत्या जगाच्या गरजा ओळखून स्वतःमध्ये आवश्यक कौशल्ये विकसित करावीत, यासाठी या कार्यक्रमातून प्रेरणा मिळणार आहे.

‘दीक्षारंभ’च्या माध्यमातून नव्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण, उपलब्ध सुविधा, विविध उपक्रम आणि भविष्यातील करिअरच्या संधी यांची ओळख करून दिली जाणार आहे. त्यामुळे डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ज्ञान, प्रेरणा आणि नव्या संधींच्या उत्साहात होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button