कुर्ल्यात घरावर क्रेन कोसळली; १० हून अधिक जण जखमी!

मुंबई | तोडकामासाठी इमारतीवर क्रेनच्या मदतीने जेसीबी उचलत असताना अचानक संतुलन बिघल्याने क्रेन चार ते पाच झोपड्यांवर कोसळल्याची घटना शुक्रवारी पहाटे कुर्ला परिसरात घडली आहे. या दुर्घटनेत १२ जण जखमी झाले असून त्यांच्यावर शीव आणि भाभा रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
कुर्ला पूर्व परिसरातील इंदिरा नगरमध्ये एमएमआरडीएच्या एका जुन्या इमारतीचे पाडकाम सुरू होते. पाडकामासाठी मध्यरात्री येथे एक जेसीबी आणण्यात आला होता. या जेसीबी इमारतीच्या वर नेण्यासाठी क्रेन मागविण्यात आली होती. पहाटे ३ च्या सुमारास क्रेनच्या साह्याने जेसीबी इमारतीवर चढवण्यात येत होती. मात्र याच वेळी अचानक संतुलन बिघडल्याने क्रेन बाजूच्या चार ते पाच झोपड्यांवर कोसळली.
हेही वाचा
भारत-श्रीलंका दुसरी कसोटी कधी, कुठे आणि कशी पाहता येईल? जाणून घ्या..
#Mumbai | कुर्ल्यात घरावर क्रेन कोसळली;
१० हून अधिक जण जखमी!कुरेशी नगर परिसरात काल उशिरा रात्री घडली भीषण दुर्घटना. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 🏗️🏥#BreakingNews #Kurla #MumbaiAccident #MumbaiNews #MarathiBatmyan pic.twitter.com/3L4MpVAy3v
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) August 21, 2026
सुदैवाने या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र या दुर्घटनेत १२ जण किरकोळ जखमी झाले. या दुर्घटनेनंतर अग्निशमन दल, पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना शीव आणि कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल केले. तर घटनेच्या वेळी कुर्ला ट्रॉम्बे रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर यावेळी तुटली आहे. या मार्गावर रेल्वेकडून चेंबूर परिसरातील सरकारी कंपन्यांना मालवाहतूक केली जाते.





