ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जागृती मंचतर्फे “Hack the Problem, Build the Future – AI Poster Presentation Challenge” स्पर्धेचे आयोजन

पिंपरी : एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळंदी येथील जागृती मंचतर्फे “Hack the Problem, Build the Future – AI Poster Presentation Challenge” या संकल्पनेवर आधारित AI पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन १८ ऑगस्ट २०२६ रोजी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनातील तसेच सामाजिक समस्या ओळखून त्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून नाविन्यपूर्ण, व्यवहार्य व समाजोपयोगी उपाय सुचवावेत, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, नवोपक्रमशीलता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि सादरीकरण कौशल्यांना चालना मिळाली.

स्पर्धेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आरोग्य व कल्याण, शिक्षण व कौशल्य विकास, पर्यावरण व शाश्वतता, स्मार्ट व सर्वसमावेशक समाज तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा नैतिक व जबाबदार वापर हे उपविषय देण्यात आले होते.

स्पर्धकांना वास्तविक समस्या, त्यावरील AI-आधारित उपाय आणि त्या उपायाचा अपेक्षित परिणाम यांचा विचार करून पोस्टर तयार करण्यासाठी ६० मिनिटांचा कालावधी देण्यात आला.

हेही वाचा –  रील्स-शॉर्ट्स पाहताना मेंदूत नेमकं काय घडतं? नव्या संशोधनातून धक्कादायक खुलासा

स्पर्धेतील पोस्टरचे परीक्षण प्रमुख पाहुणे श्री. नारायण भास्कर बांगर आणि डॉ. सुनील महाजन, विद्यार्थी व्यवहार विभागाचे सहयोगी अधिष्ठाता यांनी केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकता, नाविन्यपूर्णता, विषयाची उपयुक्तता, समस्या-निराकरणाची परिणामकारकता आणि AI च्या योग्य वापराच्या आधारे पोस्टरचे मूल्यमापन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. नारायण भास्कर बांगर हे सामाजिक कार्यकर्ते असून टाटा मोटर्स लिमिटेड, पिंपरी, पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना नवोपक्रम, सामाजिक बांधिलकी आणि समाजोपयोगी तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे, विद्यार्थी व्यवहार विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील महाजन, जागृती मंच समन्वयक प्रा. रश्मी पाठक, कार्यक्रम समन्वयक डॉ. ज्योती बच्छाव तसेच जागृती मंचाच्या संपूर्ण टीमचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध सामाजिक समस्यांवर AI-आधारित अभिनव उपाय मांडले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार वापर, सर्जनशील विचार, समस्या-निराकरणाची क्षमता आणि समाजोपयोगी नवकल्पना विकसित करण्याची प्रेरणा निर्माण झाली. “समस्या सोडवा, भविष्य घडवा” या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना भविष्यातील जबाबदार, नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानस्नेही समस्या-निराकरणकर्ते बनण्याची दिशा मिळाली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button