Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

Asian Games 2026 | भारत- बांगलादेश हायव्होल्टेज सेमीफायनल सामना कधी, किती वाजता? जाणून घ्या..

India vs Bangladesh Semi Final | भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत दमदार सुरूवात केली आहे. या स्पर्धेतील क्वार्टर फायनलच्या लढतीत भारतीय संघाने जपानवर एकतर्फी विजय मिळवून स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. काही तासांनंतर भारतीय संघ सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. रविवारी २० सप्टेंबरला भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सेमीफायनलचा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान हा सामना भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होणार आहे? जाणून घ्या..

आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या क्रिकेट प्रकारातील सेमीफायनलमध्ये जाणारे ४ संघ ठरले आहेत. भारतीय संघासह पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या चारही संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा सेमीफायनलचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. तर पाकिस्तानचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. एकाच दिवशी दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना २० सप्टेंबरला पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ५:३० मिनिटांनी सुरू होणार आहे. तर ५ वाजता नाणेफेक होईल. हा सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाचं एक पदक निश्चित होणार आहे.

हेही वाचा

ममता बॅनर्जींना एकापाठोपाठ दोन मोठे धक्के! नंदिग्रामनंतर रेजीनगरमधूनही तृणमूल उमेदवाराची माघार

सामना किती वाजता सुरू होणार आहे?

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये होणारा सेमीफायनलचा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी १०: ३० मिनिटांनी सुरू होणार आहे. तर नाणेफेक सकाळी १० वाजता होईल. हा सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. जो संघ जिंकेल, तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरेल. तर सामना गमावणारा संघ रौप्यपदकाचा मानकरी ठरेल. हा सामना सोनी स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button