टेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत एसटी स्मार्ट कार्ड वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांकडून उपक्रमाचे स्वागत

नगरसेविका कविता भोंगाळे-पाटील यांच्या पुढाकारातून शेकडो लाभार्थ्यांना स्मार्ट कार्डचे वाटप

पिंपरी-चिंचवड : नागरिकांचा एसटी प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि डिजिटल करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘एसटी स्मार्ट कार्ड’ (NCMC) वाटप शिबिराला भोसरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मा. कविता भोंगाळे-पाटील यांच्या विशेष पुढाकारातून दिघी रोड येथील विदर्भ मित्र मंडळ, सिद्धेश्वर हायस्कूलजवळ, येथे गुरुवारी (दि. १३ ऑगस्ट) या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत झालेल्या या शिबिरात यापूर्वीच्या शिबिरात आवश्यक कागदपत्रे जमा केलेल्या शेकडो लाभार्थ्यांना प्रत्यक्ष एसटी स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. स्मार्ट कार्ड हातात मिळाल्यानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त करत हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले.

डिजिटल आणि सुलभ एसटी प्रवासाला चालना

स्मार्ट कार्डच्या माध्यमातून एसटी प्रवास अधिक सुलभ आणि आधुनिक करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच नियमित एसटी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार असल्याने लाभार्थ्यांनी आयोजकांचे आभार मानले.

या वेळी भाजप सरचिटणीस विकास (भाऊ) डोळस, नगरसेवक सागर (भैया) गवळी, मंडल अध्यक्ष प्रमोद परदेशी, माजी मंडल अध्यक्ष रवींद्र नांदुरकर, शहर महिला आघाडी सरचिटणीस रोहिणीताई मांढरे, प्रभाग अध्यक्ष स्वातीताई शिर्के, कल्पनाताई धाडसे, संदीप पंडित, दीपालीताई मोरे आणि अशोक भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. विदर्भ मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक भगत, सचिव ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह हरिभाऊ तांदळे, गोवर्धन बोबडे, कैलास नप्ते, शुगुफ्ता शेख, सुदामभाऊ मुंढे, श्रीकृष्ण मुकुंदे, गजानन कळसकर, विनायकराव काळपांडे, सुखदेव वानखडे आणि सुखदेव उमरकर यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.

लोकहिताच्या उपक्रमांना सातत्याने प्राधान्य

नागरिकांच्या दैनंदिन गरजा आणि सोयी-सुविधा लक्षात घेऊन भविष्यातही अशाच प्रकारचे विविध लोकहिताचे आणि समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जातील,” अशी भावना आयोजक व मान्यवरांनी व्यक्त केली. दरम्यान, स्मार्ट कार्डची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल भोसरीतील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नियमित एसटी प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांच्या प्रत्यक्ष गरजा ओळखून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे भोसरी परिसरातून स्वागत होत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button