उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना! चमोलीतील वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलन; ७ कामगारांचा मृत्यू, १४ जखमी

डेहराडून | उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील मायापूर येथे जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात भीषण दरड कोसळल्याची घटना घडली आहे. गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या या दुर्घटनेत बोगद्यात काम करणाऱ्या सात कामगारांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहेत. तर अद्याप दोन कामगार बेपत्ता असून आपत्कालीन पथकांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे (HCC) काम सुरू असलेल्या २ किलोमीटर लांबीच्या बोगद्यात गुरुवारी संध्याकाळी ७:०५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बोगद्याच्या वरच्या बाजूला भूस्खलन झाल्यामुळे सुमारे १.४ किमी अंतरावर मोठी पोकळी निर्माण झाली. या पोकळीतून अचानक मोठ्या प्रमाणावर पाणी आणि चिखल बोगद्यात वेगाने शिरल्याने आत काम करणारे २२ कामगार अडकून पडले. बोगद्यातील पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पाण्याचे शक्तिशाली पंप बसवले आहेत.
हेही वाचा
“गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही”; राहुल गांधींनी केली पंतप्रधान मोदींची मिमिक्री
🚨 उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना! चमोलीतील वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलन; ७ कामगारांचा मृत्यू, १४ जखमी
चमोली जिल्ह्यातील पिपलकोटी भागात निर्माणाधीन जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी भूस्खलन आणि पाणी साचल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.
बोगद्यात अडकलेल्या २२ कामगारांपैकी २१ जणांना… pic.twitter.com/WysheEIber
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) August 14, 2026
लष्कर आणि आपत्कालीन पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तात्काळ बचावकार्य हाती घेतले. आत अडकलेल्या २२ कामगारांपैकी १४ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. उर्वरित दोन बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यासाठी लष्कर, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), जिल्हा आपत्ती निवारण दल आणि स्थानिक पोलिसांची संयुक्त पथके युद्धपातळीवर शोधमोहीम राबवत आहेत.





