संत साई इंग्लिश मिडीयम हायस्कूल भोसरी येथे क्रांती दिन जल्लोषात साजरा

पिंपरी : संत साई इंग्लिश मीडियम हायस्कूल भोसरी, आदिनाथ नगर या ठिकाणी ९ऑगस्ट क्रांती दिन मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. प्राथमिक स्वरूपात प्रमुख पाहुणे व संस्थेचे विश्वस्त श्री. ओम प्रकाश सर (रिटायर्ड लेफ्टनंट col.), श्री. अंकुश गोरडे (अध्यक्ष – नारायण हट स्कूल, इंद्रायणी नगर, श्री. संदिप मुंगसे (अध्यक्ष – UK गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, आळंदी )तसेच पालक शिक्षक संघांचे प्रतिनिधी यांनी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्रतापूर्वक वंदन केले व मशाल प्रज्वलित करून क्रांती दिनाची सुरुवात केली . शाळेच्या स्थापनेपासूनच प्रत्येक वर्षी क्रांती दिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाद्वारे “क्रांती सप्ताह “या ठिकाणी उत्साहात संपन्न केला जातो. याही वर्षी “क्रांती फॉर नेशन बिल्डिंग” हा क्रांतिकारी विचार घेऊन शाळा प्रशासन क्रांती सप्ताह साजरा करणार आहे.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संजना सिंग मॅडम यांनी केले. शाळेत क्रांती सप्ताहा निमित्त
रोज वेगवेगळे विषय घेऊन समाज प्रबोधन करण्यात येणार आहे.
क्रांती सप्ताहा निमित्त प्रथम दिनी प्रबोधनपर विषय क्रांती अगेन्स्ट लेझीनेस हा होता. शाळेत क्रांती सप्ताह साजरा होत असताना

पुढील दिवसांचे विषय पुढीलप्रमाणे आहेत. दिनांक
10 तारखेला – क्रांती अगेन्स्ट मोबाईल अडिकशन (addiction)
11 तारखेला – क्रांती अगेन्स्ट एक्स्कुसेस (excuses)
12 तारखेला – क्रांती अगेन्स्ट वेस्ट (waste)
13 तारखेला – क्रांती अगेन्स्ट नेगेटिव्हिटी (negativity)
14 तारखेला – क्रांती अगेन्स्ट डिसरेस्पेक्ट (disrespect) असे कार्यक्रमाचे आयोजन आहे.
हेही वाचा – भगवत गीतेच्या निर्मितीचा सार सांगत राज्यपालांचा जेन झी, जेन अल्फाशी संवाद

९ ऑगस्ट – क्रांती दिवस चा विषय होता क्रांती अगेन्स्ट लेझीनेस. आळस हा मानवाचा शत्रू आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. विभावरी सुतार व कु. आरोही शिंदे तसेच आभारप्रदर्शन कु. चिरायू वाबळे याने केले.
कु. अनन्या राऊत (इ. 9वी) हिने या वर्षी ची थिम “क्रांती फॉर नेशन बिल्डिंग” ची माहिती दिली. कु. ज्ञानेश्वरी सांगळे (इ. 9वी) हिने भाषण केले, कु. अन्वी बाबर (इ. 7वी) हिने कथा सांगितली तसेच कु. अवनी हांडे (इ. 9 वी) हिने कविता सादर केली. इ. 8 वी च्या विध्यार्थ्यानी सादर केलेल्या नुक्कड नाटकाने सर्वाना मोहित केले.
शाळेचे संस्थापक श्री. शिवलिंग ढवळेश्वर सर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. ओमप्रकाश सर यांनी विद्यार्थ्यां यांनी मुलांना आळस झटकून व्यायाम, भरपूर अभ्यास करण्याचा सल्लाह दिला.
मनशक्तीच्या मूलभूत तत्त्वांना अनुसरून शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानदाना बरोबर संस्कारही दिला जातो असेही सरांनी सांगितले.
श्री. अंकुश गोरडे यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या क्रांतीकारकांची यथोचित माहिती विद्यार्थ्यांना दिली.
श्री. संदिप मुंगसे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
“भारत माता की जय,” “वंदे मातरम”. “इन्कलाब जिंदाबाद” च्या घोषणांनी आणि ढोल ताशाच्या गजरात शाळेचा परिसर दुमदुमून गेला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माध्यमिक विभागाच्या प्रमुख सौ. रूपाली खोल्लम,सहशिक्षिका सौ.मालन लिंगाडे ,सौ. श्वेता नारायणगावकर, सौ. रिया पोतदार, श्री.मनोज वाबळे सर , श्री.संजय अनर्थे, श्री. अक्षय राणे सर, श्री.प्रमोद शिंदे सर, शिक्षक पालक संघ प्रतिनिधी सौ.दीपिका ननावरे , सौ. सुनिता केरकर, सौ. अरुणा कुंभार, सौ. पूजा शिंदे, सौ. प्रगती भोयर, सौ. रुपाली शिंदे हे कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना विनम्रतापूर्वक अभिवादन करून क्रांती दिनाची सांगता झाली.





