TOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

आस्थेवाईक विचारपूस, लाडू भरवला, डोक्यावर हात ठेवला अन् शुभेच्छा… ऑलिम्पिकमधील पदक विजेत्यांसोबत मोदींचा संवाद

Narendra Modi :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंचे त्यांच्या निवासस्थानी स्वागत केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीने देशाला गौरव प्राप्त झाला आहे आणि ती तरुणांना प्रेरणा देईल. पंतप्रधान मोदींनी २2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंसोबत झालेल्या संभाषणाचा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला. त्यांनी बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन यांचेही कौतुक केले, ज्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान ग्लासगो येथील एका रेस्टॉरंटमध्ये प्रदर्शित केलेल्या भारताच्या चुकीच्या नकाशावर आक्षेप घेतला होता.

पंतप्रधान मोदींनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांना असेही सांगितले की, ” त्यांनी केवळ पदकेच जिंकली नाहीत, तर एका पिढीला प्रेरणाही दिली आहे. तसेच खेलेगा इंडिया तो खिलेगा इंडिया असे म्हणाले आहे, भारत माता की जय असंही ते म्हणाले आहे.” त्यांनी प्रत्येक खेळाडूसोबत थोडा थोडा संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मोदी यांनी मिराबाई चानूचे खूप कौतुक केले, त्यांनी तिला मेडल जिंकल्यानंतर तू इतकी का रडत होतीस असं विचारले, तर नाशिकच्या दिलीप महाडू गावितचेही कौतुक केले. मोदी यांनी प्रत्येक खेळाडूसोबत संवाद साधला.

हेही वाचा –  रोजच्या आहारात शेवगा का हवा? जाणून घ्या ‘५’ जबरजस्त फायदे

मोदी म्हणाले की, “माझ्या हा सन्मानचा विषय आहे, पण मेहनत ही पूर्णपणे तुमची आहे. तुम्हाला माझी आठवण आली त्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे. स्पोटर्स व्यवस्था एक गोष्ट आहे पण देश पदक तेव्हा जिंकतात जेव्हा देशात स्पोर्टस कल्चर असते. ”

“मित्रांनो तुम्ही खूप मोठे काम केले आहे. देशाचे नाव रोशन केले आहे. मी तुमचे खूप आभार मानतो. आणि विश्वास ठेवा पुढेही तुम्ही विजय व्हाल आणि पुन्हा एकदा आपण इथे भेटू.” असं म्हणत मोदी यांनी आपलं भाषण संपवलं. यानंतर मीराबाई चारुला स्वत:च्या हातून लाडू खाऊ घातला, तसेच त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवत तिला आर्शिवाद दिला. यानंतर प्रत्येक मेडलिस्ट सोबत मोदी यांनी फोटोशूट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button