तुमच्या गाडीत इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा! E20 पेट्रोलबाबत तेल कंपन्यांनी केला मोठा खुलासा

E20 Petrol : ई20 पेट्रोलच्या अतिरिक्त देशव्यापी चाचणीत उच्च आर्द्रता किंवा क्लोराईड भेसळीच्या दाव्यांना समर्थन देणारा कोणताही पुरावा आढळला नाही आणि संपूर्ण पुरवठा साखळीत इंधनाची गुणवत्ता विहित मर्यादेत राहिली आहे, सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) सांगितले.
ई20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) मध्ये आर्द्रता आणि क्लोराईडच्या उपस्थितीचा आरोप करणार्या अलीकडील माध्यमांतील वृत्तांनंतर ही चाचणी मोहीम राबवण्यात आली. कंपन्यानी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, या मोहिमेत संपूर्ण पुरवठा साखळीचा समावेश होता. शास्त्रीयदृष्ट्या तयार केलेल्या चाचण्यांद्वारे इंधन भेसळीमुळे धोक्याची कोणतीही शक्यता असल्याचे पुरावे नाहीत.
हेही वाचा – आस्थेवाईक विचारपूस, लाडू भरवला, डोक्यावर हात ठेवला अन् शुभेच्छा… ऑलिम्पिकमधील पदक विजेत्यांसोबत मोदींचा संवाद
सरकारने पेट्रोल मिश्रणात वापरल्या जाणार्या इथेनॉलसाठी क्लोराईडचे कठोर निकष निर्धारित केले आहेत आणि त्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी रिफायनरी, डिस्टिलरी, डेपो, टर्मिनल आणि किरकोळ विक्री केंद्रांवर देखरेख प्रणाली लागू केली आहे. कंपन्यांनी सांगितले की, सुमारे 90,000 किरकोळ विक्री केंद्रांवर भूमिगत साठवण टाक्यांची अनिवार्य तपासणी सुरू झाली असून, ही तपासणी दिवसातून 8-12 वेळा केली जात आहे. आतापर्यंत टाकीत पाणी शिरल्याचे कोणतेही प्रकरण आढळले नाही.
तेल मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ए20 इंधनाच्या गुणवत्तेबद्दलची चिंता फेटाळून लावली आणि म्हणाले की देशाच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाभोवती काही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतात सुमारे 1,07,000 इंधन किरकोळ विक्री केंद्रे आहेत. जी दररोज 7 कोटी ग्राहकांना सेवा देतात.





