Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिक TCS धर्मांतर प्रकरण: आरोपी निदा खानला आश्रय देणारा नगरसेवक अटकेत

नाशिक | नाशिकमधील TCS कंपनीत घडलेल्या बहुचर्चित लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. AIMIM चा नगरसेवक मतीन पटेल याला पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे. न्यायालयाचे समन्स बजावूनही उपस्थित न राहिल्याने मतीन पटेलविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. या कारवाईपूर्वी प्रशासनाने मतीन पटेल याच्या बेकायदेशीर घरासह कार्यालयावर बुलडोझर चालवला होता.

या प्रकरणातील सह-आरोपी निदा खान ही ५ महिन्यांची गरोदर असल्याने, जुलै महिन्यात सत्र न्यायालयाने तिच्या पोटातील बाळाच्या भविष्याचा आणि आरोग्याचा विचार करून तिला जामीन मंजूर केला होता. “जन्माला येणाऱ्या निष्पाप बालकाला तुरुंगातील कैदेचा किंवा सामाजिक कलंकाचा त्रास सहन करावा लागू नये,” असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने भगवान श्रीकृष्णाच्या कारागृहातील जन्माचा संदर्भ दिला होता. तर जुलैअखेर न्यायालयाने या प्रकरणातील इतर ५ आरोपींनाही अटींनुसार जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचा

जंतर-मंतरवरील आंदोलन ही केवळ सुरुवात; राज ठाकरेंचे वक्तव्य

मार्च २०२६ मधील प्रकरणाची पार्श्वभूमी

मार्च २०२६ मध्ये नाशिक येथील TCS कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण करणे, अश्लील शेरेबाजी करणे आणि धर्मपरिवर्तनासाठी दबाव आणल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रझा रफिक मेमन याने तक्रारदार महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ केला होता, तर निदा खानसह इतरांनी त्याला मदत केल्याचे उघड झाले होते.

SIT कडून ९ गुन्ह्यांचा तपास; कंपनीकडून कर्मचाऱ्यांना निलंबन

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्यांचे शोषण, विनयभंग, धार्मिक भावना दुखावणे आणि मानसिक छळ यांसारख्या ९ वेगवेगळ्या तक्रारींवर SIT कडून तपास सुरू असून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल केले आहे. दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल घेत TCS कंपनीने सर्व संशयित कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button