मीराबाई चानूची राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण हॅटट्रिक! ४८ किलो वजनी गटात पटकावले ऐतिहासिक सुवर्णपदक

Mirabai Chanu | भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. ग्लासगो येथे सुरु असलेल्या ‘कॉमनवेल्थ गेम्स २०२६’ मध्ये वेटलिफ्टिंगमधील ४८ किलोग्रॅम वजनी गटात तिने तब्बल १९० किलोग्रॅम वजन उचलून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक कामगिरीसह राष्ट्रकुल स्पर्धेत सलग तिसरे सुवर्णपदक जिंकण्याचा विक्रम तिने आपल्या नावे केला आहे.
स्पर्धेची सुरुवात मीराबाईसाठी काहीशी आव्हानात्मक होती. स्नॅचच्या पहिल्या प्रयत्नात ८२ किलो वजन उचलण्याचा तिचा प्रयत्न अयशस्वी ठरला. मात्र, खचून न जाता दुसऱ्या प्रयत्नात तिने ८२ किलो वजन उचलून दमदार पुनरागमन केले. तर तिसऱ्या प्रयत्नात तब्बल ८५ किलो वजन उचलून तिने राष्ट्रकुल स्पर्धेतील नवीन विक्रमाची नोंद केली.
Calm. Composed. Record-breaking. ????️♂️
Mirabai Chanu lifts 85 kg to set a new Commonwealth Games snatch record ????
Watch the Commonwealth Games LIVE NOW exclusively on Sony Sports Network TV channels and Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV #Glasgow2026 #GlasgowMeinTiranga… pic.twitter.com/iMrBXx3Sv1
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 26, 2026
हेही वाचा
अमेरिकेच्या सिएटल सेंटरमध्ये अंदाधुंद गोळीबार, अनेक जण जखमी
क्लीन अँड जर्क फेरीत पहिल्या प्रयत्नात १०५ किलो वजन उचलण्यात अपयश आले, तरी दुसऱ्या प्रयत्नात १०५ किलो वजन यशस्वीरीत्या उचलत तिने भारतासाठी सुवर्णपदक पक्के केले. दुसऱ्या फेरीतच पदक निश्चित झाल्याने तिला तिसऱ्या वेळेस प्रयत्न करण्याची गरजही भासली नाही. यापूर्वी मीराबाईने २०१८ (४८ किलो गट) आणि २०२२ (४९ किलो गट) मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
भारताचे स्पर्धेतील तिसरे पदक
ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतील भारताचे हे आतापर्यंतचे तिसरे पदक ठरले आहे. याआधी पुरुषांच्या हेवीवेट पॅरा-पॉवरलिफ्टिंग प्रकारात भारताने कांस्यपदक पटकावले होते, तर २८ वर्षीय ऋषिकांत सिंगने ६० किलो वजनी गटात एकूण २६४ किलो वजन उचलून रौप्यपदक मिळवले होते. आता मीराबाई चानूच्या या सुवर्णपदकामुळे भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.





