Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

अमेरिकेच्या सिएटल सेंटरमध्ये अंदाधुंद गोळीबार, अनेक जण जखमी

Seattle Center Shooting | अमेरिकेतील सिएटल शहरातील प्रसिद्ध ‘बाइट ऑफ सिएटल’ या वार्षिक खाद्य महोत्सवादरम्यान एका भीषण गोळीबाराची घटना घडली आहे. सिएटल सेंटर येथील स्पेस नीडल आणि इंटरनॅशनल फाउंटनच्या आसपास झालेल्या या गोळीबारात अनेक जण जखमी झाले असून, परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने संपूर्ण परिसर रिकामा केला असून मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

‘कोमो न्यूज’शी बोलताना प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अचानक एकापाठोपाठ एक गोळीबाराचे अनेक आवाज आले आणि त्यानंतर लोकांमध्ये पळापळ सुरू झाली. लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धावू लागले. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दल आणि आपत्कालीन वैद्यकीय पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढत संपूर्ण परिसर वेढा घालून सुरक्षित केला आहे.

हेही वाचा

गांधींचा विचार वाचवला पाहिजे; शरद पवार

 

संशयित हल्लेखोर अद्याप फरार?

सिएटल पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत अनेक जण जखमी झाले असून नागरिकांना सध्या या परिसरात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोशल मीडियावर एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याचे फोटो/व्हिडिओ दिसत असले तरी, त्याचा या गोळीबाराशी थेट संबंध आहे की नाही, याला अधिकाऱ्यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. एका पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार संशयित हल्लेखोर अद्याप फरार असण्याची शक्यता आहे, मात्र पोलिसांनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

जखमींची अचूक संख्या, त्यांच्या दुखापतींचे गांभीर्य आणि गोळीबारामागील मुख्य हेतू अद्याप अस्पष्ट असून सिएटल पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button