Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘नागपूरच्या सुनियोजित विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : जागतिक बँकेच्या अहवालानुसार येत्या दहा वर्षात नागपूर शहर जलदगतीने विकसित होत असून पायाभूत सुविधांच्या विकासामुळे शहराचा चेहरा बदलत आहे. एक वैश्विक शहर नवी ओळख निर्माण होत असल्यामुळे शहराच्या सुनियोजित विकासासाठी निधी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

महानगरपालिकेच्या हिरवळीवर आयोजित विशेष समारंभात शहरातील ४७६ सफाई कामगारांना कायम नियुक्तीपत्र तसेच सरळसेवा भरतीने १०३ युवकांना नियुक्तीपत्राचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नीता ठाकरे, आमदार सर्वश्री मोहन मते, कृष्णा खोपडे, उपमहापौर लिला हाथीबेड, राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष शेरसिंह डागोर, स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी, महापालिका आयुक्त डॅा. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त मुरगनाथन एम., श्री. अंकित आदी अधिकारी तसेच विविध समित्यांचे सभापती, पदाधिकारी व नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा –  मुंबईकरांसाठी गुड न्यूज! BKC ते वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पर्यंत सिग्नल-मुक्त कॉरिडॉर सुरू होणार

शहर स्वच्छ व सुंदर राहिल्यास त्याचा सार्वजनिक आरोग्यावरही परिणाम होतो. स्वच्छतादूतांचा आस्थापना खर्च जास्त असल्यामुळे नियुक्तीसाठी विशेष सूट देण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात भरती झाल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार ४७६ स्वच्छतादूतांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत. या समितीने सेवाविषयक बाबींचा अहवालानुसार शासन निर्णय निघूनही भरती होत नव्हती. या अहवालाच्या अंमलबजावणीला प्राधान्य दिल्यामुळे सफाई कामगारांचे विविध प्रश्न सोडविण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

स्वच्छता कर्मचाऱ्यांना नागपूर महानगरपालिकेने नियुक्तीपत्रे देण्यासोबतच त्यांच्यासाठी मोफत घरकुल देण्याची योजना राज्यात सर्वात प्रथम राबविली आहे. ३०० चौरस फुटांच्या मोफत घरांसोबतच अधिकच्या बांधकामासाठी अतिरिक्त शुल्क भरल्यास मोठे घर देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, शहर स्वच्छ राहावे, आरोग्य चांगले राहावे, यासोबतच स्वच्छता दूतांच्या जीवनात परिवर्तन सुद्धा घडविण्यासाठी विशेष योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी जाहिर केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button