Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

पेपरफुटी प्रकरणावर केंद्र सरकारचा मोठा निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब

Union Cabinet approves Anti-Paper Leak Bill : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेपरफुटी सुधारणा विधेयकाला मंजुरी देऊन मोदी सरकारने देशभरातील लाखो तरुण आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याला सुरुक्षा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. स्पर्धा परीक्षांमधील सावळ्यागोंधळाला, गैरप्रकारांना आणि पेपरफुटी रोखण्यासाठी हा अत्यंत कठोर कायदा आणण्यात येत आहे.

हेही वाचा –  अमित शाहांचे नियोजन, नड्डांची मध्यस्थी अन् सोनम वांगचुक यांची संमती… ; वाचा उपोषण संपवण्यामागची कहाणी

या नव्या विधेयकानुसार, पेपर लीक करणाऱ्या आरोपींना १० वर्षांपर्यंतचा कठोर तुरुंगवास आणि १ कोटी रुपयांपर्यंतचा भरमसाठ दंड ठोठावण्याची कडक तरतूद करण्यात आली आहे. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने या निर्णयाद्वारे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचा आणि गुन्हेगारांवर दहशत निर्माण करण्याचा मोठा मास्टर प्लॅन आखला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button