Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबईचा पाऊस जगात भारी! पाच दिवसांत तब्बल ९२० मिमी पाऊस

Mumbai Rain | मुंबईतला पाऊस आणि रस्त्यांवर साचणारे पाणी हा दरवर्षीच चर्चेचा विषय असतो. मात्र, यावेळची चर्चा काहीशी वेगळी आणि विशेष ठरली आहे. मुंबईची तुंबई झाली असली, तरी यंदा मुंबईत पडलेल्या पावसाने जागतिक पातळीवरील सर्वच प्रमुख शहरांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. गेल्या पाच दिवसांत जगातल्या आणि देशातल्या प्रमुख शहरांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक पाऊस पडला असून, मुंबई या यादीत पहिल्या क्रमांकावर आली आहे.

‘West Coast Weatherman’ आणि ‘@RainTracker’ या एक्स (ट्विटर) अकाऊंटने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जगातल्या प्रमुख महानगरांमध्ये महिनाभरात जेवढा पाऊस होतो, त्याच्या जवळपास तिप्पट पाऊस मुंबईत अवघ्या पाच दिवसांत झाला आहे. या पोस्टमध्ये “मुंबईच्या पावसाला जगात कोणीही स्पर्धक नाही,” असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तसेच मुंबईत संपूर्ण जुलै महिन्यात जेवढा पाऊस पडतो, ते टार्गेट अवघ्या पाच दिवसांत पूर्ण झाले आहे.

जगातल्या प्रमुख शहरांची वर्षभराची पावसाची स्थिती काय?

हो ची मिन (व्हिएतनाम): गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात येथे सर्वाधिक ४९० मिमी पावसाची नोंद झाली होती.

मनिला (फिलीपीन्स): ऑगस्ट महिन्यात ४७६ मिमी पाऊस पडला होता.

लागोस (नायजेरिया): जून महिन्यात ४३३ मिमी पावसाची नोंद झाली होती.

सिओल (दक्षिण कोरिया): जुलै महिन्यात ४१४ मिमी पाऊस पडला होता.

ढाका (बांगलादेश): जुलै महिन्यात ३९१ मिमी पावसाची नोंद झाली होती.

हेही वाचा

दिलजीत दोसांजच्या ‘सतलज’ चित्रपटावर बंदी; ‘झी ५’ वरून अचानक हटवला!

जकार्ता (इंडोनेशिया): फेब्रुवारी महिन्यात ३८१ मिमी पाऊस झाला होता.

कुआलालंपूर (मलेशिया): नोव्हेंबर महिन्यात ३६५ मिमी पावसाची नोंद झाली होती.

टोकियो (जपान): ऑगस्ट महिन्यात २३४ मिमी पाऊस पडला होता.

शांघाय (चीन): ऑगस्ट महिन्यात २२६ मिमी पावसाची नोंद झाली होती.

लाहोर (पाकिस्तान): जुलै महिन्यात केवळ १८९ मिमी पाऊस पडला होता.

या जागतिक आकडेवारीचा विचार केला, तर जगात सर्वाधिक पाऊस नोंदवणाऱ्या व्हिएतनामच्या ‘हो ची मिन’ शहराचा (४९० मिमी) रेकॉर्डही मुंबईने मोडीत काढला आहे. मुंबईत या वर्षी जुलैच्या अवघ्या पाच दिवसांत तब्बल ९२० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जुलैचा कोटा पाच दिवसांतच पूर्ण

या धक्कादायक आणि विक्रमी आकडेवारीमुळे मुंबईचा पाऊस आता जागतिक पातळीवर पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. या पाच दिवसांतील पावसाने मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत केले असले, तरी जागतिक हवामान अभ्यासकांसाठी हा एक अत्यंत मोठा आणि आश्चर्यकारक बदल ठरला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group