ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

७९ व्या स्तातंत्र्यदिनाचा अनोखा सोहळा

विद्यानिकेतन इंग्लिश मिडिअम स्कूल भव्य प्रांगणावर ७९वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साही व देशभक्तीमय वातावरणात संपन्न

चाकण : प्रमुख अतिथी मा. श्री. मुरलीकांत राजाराम पेटकर ( जागतिक पॅरालिंपिक ५० मीटर फ्रि स्टाइल जलतरण स्पर्धेत प्रथम सुवर्णपदक विजेते , विश्व विक्रमाचे मानकरी , अर्जुन पुरस्कार प्राप्त , पद्मश्री पुरस्कार प्राप्त) यांच्या शुभहस्ते तसेच मा. श्री. दत्तात्रय सुकरे ( भारतीय सैन्य – सेवानिवृत्त हवालदार ) , मा. श्री. अमित मोहिते पाटील ( माजी सैनिक , महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी सरचिटणिस ) मा.श्री . हर्षल वाघेला, संस्थेचे संस्थापक मा. श्री. साहेबराव देशमुख , खजिनदार सौं . सुमनताई देशमुख , अध्यक्ष मा. श्री. शामराव देशमुख , सचिव डॉ . सौं. रोहिणीताई देशमुख , उपाध्यक्ष मा. श्री. अक्षयराज देशमुख , संचालिका सौं. हर्षलताई देशमुख , संचालक श्री. डी. पी. सोनवणे यांच्या उपस्थितित ध्वजारोहण करण्यात आले . राष्ट्रगीत , झंडा गीत गाऊन मातृभूमीला सर्वांनी अभिवादन केले. विद्यार्थी पथकाने ध्वजाला व प्रमुख अतिथी, मान्यवरांना मानवंदना दिली .
याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व शारीरिक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले . जसे देशभक्तिपर गीत गायन , नृत्य , नाटक , मल्लखांब , पिरॅमिड , डब्बेल्स , ताली योगा इ.
प्रमुख आकर्षण ठरले मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके .

‘आझाद हिंद सेना से ऑपरेशन सिंदूर तक ‘ या विषयावर सादर केलेल्या नाटकाने स्त्रियांचे स्वातंत्र संग्रामातील व सदय स्थितित असणारे भारतीय सैन्यात असणारे योगदान अनुभवले.
इयत्ता ७वी तील कु. स्पृहा मोहिते व इयत्ता १०वी तील कु.अनघा विखे या विद्यार्थीनींनी आपल्या अनोख्या शैलीत केलेल्या भाषणाने सर्वाना मंत्रमुग्ध केले. शिक्षकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मा. श्री. संजय नवसरे सर यांनी आपले विचार मांडले.

हेही वाचा  :  जयगड सोसायटीमध्ये स्वखर्चाने ३० किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वयीत!

याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी कु . श्रावणी शेवाळे कु. वेदांग माळी तसेच १४ वर्षाखालील मुलांचा फुटबॉल संघ , १७ वर्षांखालील मुलींचा फुटबॉल संघ , लोकमत आयोजित गायन स्पर्धेत प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. जिज्ञासू विद्यार्थ्यानी व पालकांनी यावेळी प्रमुख अतिथी मा. श्री . मुरलीकांत पेटकर सरांकडून त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. मुरलीकांत सरांनी आपल्या भाषणात त्यांच्या वयाच्या ८२ व्या वर्षी असलेल्या शारीरिक तंदुरुस्तीचे रहस्य आनंदी जीवन जगणे व देशभक्ती आहे असे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शामराव देशमुख सरांनी स्वातंत्र्याच्या मूल्यांचे जतन करण्याचे आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेत विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौं. स्वाती रणदिवे व विद्यानिकेतन इंग्लिश मिडिअम स्कूलचे मुख्याध्यापक श्री. दिपक शिंदे सर यांचे मोलाचे योगदान व मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इयत्ता ७वी तील कु. सक्षम कहडणे , कु. शिवांजली गायकवाड , झयत्ता ८वी तील कु. शिवम् बोऱ्हाडे व कु. देवयानी मुऱ्हे या विद्यार्थ्यानी केले. सोहळ्याची सांगता उपशिक्षिका कु. मेघना दासगुप्ता यांच्या आभार प्रदर्शनाने व वंदेमातरम् च्या गीत गायनाने झाली. सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी व पालक यांच्या सहकार्यातून सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा :महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button