मुव्ही चले हम – सितारे जमीन पे चित्रपटाचे विशेष प्रक्षेपण यशस्वी रित्या संपन्न
सोशियो इन्फिलिटी ग्रुप यांच्या पुढाकाराने सप्तर्षी फाउंडेशनने केले अप्रतिम आयोजन

पिंपरी | 12 जुलै 2025 रोजी विशेष मुले व त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित कार्यक्रमात इनॉक्स चित्रपटगृह , चिंचवड येथे 226 जणांनी सितारे जमीन पे या सिने अभिनेते आमिर खान दिग्दर्शित विशेष मुलांच्या व व्यक्तींच्या जीवनावर व संघर्षावर आधारित चित्रपटाचे विशेष प्रक्षेपण करण्यात आले.
चित्रपट पाहायला आलेल्या कुटुंबीयांपैकी अनेक कुटुंबांनी आपल्या विशेष मुलांसोबत पहिल्यांदाच चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पाहिल्याचे सांगितले.
विशेष मुलांच्या व कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून आम्ही घेतलेला पुढाकार सार्थकी झाला अशी भावना सोशियोइन्फिनिटी ग्रुप चे संस्थापक श्री. प्रथमेश मुंगी व त्यांच्या पत्नी श्रुतिका मुंगी यांनी व्यक्त केली. कार्यक्रमास श्रीमती रोशनी आचार्य , स्पार्क मिंडा सी.एस. आर. टीम कडून सुमेध जी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान सप्तर्षी फाउंडेशन निर्मित दिव्यांग बांधवांसाठी आणि कुटुंबियांसाठी भारतातील पहिल्या वन स्टॉप सोल्युशन माहितीपटाचे प्रक्षेपण देखील करण्यात आले. या संकल्पने अंतर्गत दिव्यांग बांधवांना व कुटुंबीयांना विविध दिव्यांग विषयक सहयोग सेवा एका क्लिकवर मोबाईल ॲप द्वारे त्यांच्या दारात उपलब्ध होत आहेत.

संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन व नियोजन सप्तर्षी फाउंडेशन च्या माध्यमातून करण्यात आले. सप्तर्षी फाउंडेशनच्या स्वयंसेवकांमध्ये सौ. ज्योती आगरकर, श्री. आगरकर, कल्पना मोहिते, सुचित, चैताली, हर्षल, प्रथमेश, वेदांत यांनी स्वयंप्रेरणेने योगदान दिले. तसेच श्रीमती वृषाली बोरसे व अश्विनी यांनी कार्यक्रमाची पूर्वतयारी केली.
कार्यक्रमाचे संपूर्ण फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी साठी श्री. आहेर सर, गणेश जी, राजकुमार जी, राहुल यांनी विशेष योगदान दिले.
कार्यक्रमासाठी चित्रपट पाहण्यासाठी सर्वोत्तम जागा व व्यवस्था ज्यांनी उपलब्ध करून दिली असे पीव्हीआर आयनॉक्स च्या वतीने श्री. ज्ञानेश्वर जाधव , प्रदीप जी आणि त्यांच्या टीमचे सप्तर्षी फाउंडेशन चे श्री. मनोजकुमार बोरसे यांनी आभार मानले.
हेही वाचा : ‘जीएसटी’ फसवणूक रॅकेटमधील ‘रेहमानी’वर कारवाईचा दणका!
समाजाचे प्रश्न सामाजिक प्रकल्पाच्या माध्यमातून संवेदनशीलतेने सोडवणाऱ्या माई बाल भवन, अनिकेत सेवाभावी संस्था तसेच गुडविल फाउंडेशन संस्था यांचे कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल श्री. प्रथमेश मुंगी यांनी आभार मानले.
12 जुलै सप्तर्षी फाउंडेशनचा वर्धापन दिन असून आठ वर्ष पूर्ण झाली आहे. अशा या चांगल्या दिवशी आपल्या सर्व विशेष बालकांचे व पालकांचे आशीर्वाद आम्हास लाभले , कार्यक्रमासाठी आर्थिक सहकार्य केल्याबद्दल सोशियोइन्फिनिटी ग्रुप चे संस्थापक श्री. प्रथमेश मुंगी यांचे मनोजकुमार बोरसे यांनी आभार मानले.

उपस्थित पालकांच्या काही प्रतिक्रिया
कौस्तुभ ची आई :
सप्तर्षी फाउंडेशन च्या वर्धापन दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.. मनोज सर, वृषाली मॅडम, श्रुतिका मॅडम, प्रथमेश दादा, सप्तर्षी फाउंडेशनची टीम या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद..तुमच्या मुळे आमच्या मुलांना मूवी बघायला मिळाला. कौस्तुभ मूवी बघताना खूप खुश होता. आजच्या कार्यक्रमाचं नियोजन खूप छान प्रकारे केलं होत. Thanku so much सप्तर्षी फाउंडेशन..
सायली ताई ची आई :
सप्तर्षी फाउंडेशच्य वर्धापन दिनानमित्त खूप खूप शुभेच्छा….. मी काल पहिल्यांदाच माझ्या मुलीला मूव्ही पाहायला घेऊन आले होते… माझ्या मनात खूप शंका होत्या ती बसेल का? ओरडली तर लोक बोलतील का? ती हायपर होईल का?? पण काल तुमच्या सगळ्या टीम चे जे नियोजन होते ते खूप छान होते सर्व काळजी घेतली गेली. आणि मुलांसोबत पालकांच्या मनाचा ही विचार केला गेला… माझ्या मुलीने मूव्ही खूप एन्जॉय केला… तिला खूप छान वाटलं…
तुमचे मनापासून आभार….. आणि पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा..




