ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यातील पायाभूत सुविधा विकासामुळे हिंजवडीसारख्या मायक्रो-मार्केट्सना नवी गती

पुणे | पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्र नव्या वाढीच्या टप्प्यात प्रवेश करत असून या बदलामागे वेगाने विकसित होत असलेली पायाभूत सुविधा, विस्तारत जाणारी व्यावसायिक केंद्रे आणि वाढती निवासी मागणी ही प्रमुख कारणे आहेत. केवळ पायाभूत सुविधांचा विचार केल्यास,लवकरच सुरू होणारी हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्गिका ,प्रगतिपथावर असलेले पुणे रिंग रोडचे काम, मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील नवीन बायपास तसेच बंगळुरूकडे जाणारा ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग अशा विविध प्रकल्पामुळे बांधकाम क्षेत्रात एक आशादायी चित्र तयार झाले आहे. या सर्व घडामोडींमुळे पश्चिम पुण्यातील अनेक मायक्रो-मार्केट्स गृहखरेदीदार आणि विकासकांसाठी अधिक आकर्षक ठरत आहेत.

हिंजवडी : आयटी उद्योगामुळे सातत्याने मजबूत होत असलेली बाजारपेठ

राजीव गांधी इन्फोटेक पार्कमुळे हिंजवडी हे पुण्यातील सर्वाधिक मागणी असलेल्या रिअल इस्टेट बाजारांपैकी एक बनले आहे. आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील हजारो व्यावसायिकांमुळे येथे निवासी मागणी सातत्याने वाढत आहे. हिंजवडी–शिवाजीनगरला जोडणाऱ्या मेट्रो लाईन ३ च्या पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांवर मे २०२६ पासून सेवा सुरू झाली असून, २३ कि.मी. लांबीच्या २३ स्थानकांच्या संपूर्ण मार्गिकेचे काम पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. गणेशखिंड रस्ता रुंदीकरण आणि बाणेर–शिवाजीनगर डबल डेकर उड्डाणपूल यांसारख्या प्रकल्पांमुळे शहराच्या मध्यवर्ती भागाशी संपर्क अधिक सुलभ होत आहे.

मेट्रो लाईन ३ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर हिंजवडी आणि शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रवास अधिक जलद व सोयीस्कर होईल. याचा लाभ केवळ बाणेर, बालेवाडी, वाकड आणि ताथवडे यांसारख्या विकसित भागांनाच नव्हे, तर मान आणि पुनावळे यांसारख्या उदयोन्मुख भागांनाही होण्याची अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते, या सुधारित कनेक्टिव्हिटीमुळे पश्चिम पुण्यात अधिक संतुलित शहरी विकासाला चालना मिळेल.

हेही वाचा

क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला लैंगिक शोषणाच्या आरोपांखाली अटक

ANAROCK Research च्या माहितीनुसार, २०२५ मध्ये भारतातील सात प्रमुख शहरांमध्ये ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCCs) यांनी ३२.४६ दशलक्ष चौरस फूट कार्यालयीन जागा भाडेतत्त्वावर घेतली. त्यापैकी सुमारे १५ टक्के म्हणजेच ४.८ दशलक्ष चौरस फूट व्यवहार पुण्यात झाले. त्यामुळे पश्चिम पुण्यात कार्यालयीन तसेच निवासी मालमत्तेची मागणी अधिक बळकट होत असल्याचे दिसून येते.

गेल्या दशकभरात हिंजवडी आयटी हबने पश्चिम पुण्यातील निवासी विकासाला दिशा दिली आहे. बाणेर, बालेवाडी, वाकड आणि ताथवडे यांसारखे भाग विकसित झाल्यानंतर, रोजगारकेंद्रांशी उत्तम संपर्क राखणाऱ्या आणि मोठ्या भूखंडांची उपलब्धता असलेल्या शेजारील भागांकडे विकासकांचा कल वाढला आहे.

VTP Realty नेही पश्चिम पुण्यातील पायाभूत सुविधा विकासाशी सुसंगत अशी विस्तार रणनीती स्वीकारली आहे. हिंजवडी परिसरातील उच्च-वाढीच्या कॉरिडॉरमध्ये एकात्मिक निवासी प्रकल्प विकसित करून कंपनीने रोजगारकेंद्रे, सुधारलेली कनेक्टिव्हिटी आणि विकसित होत असलेल्या सामाजिक सुविधांचा लाभ घेण्यावर भर दिला आहे. उद्योग क्षेत्राच्या मते, मेट्रो आणि रस्ते जाळे अधिक सक्षम होत असताना या भागांमध्ये मजबूत उपस्थिती असलेल्या संघटित विकासकांना सातत्यपूर्ण निवासी मागणीचा फायदा होण्याची शक्यता आहे.

“मेट्रो लाईन ३ हा पश्चिम पुण्याच्या रिअल इस्टेट विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. हिंजवडी आणि शहराच्या मध्यवर्ती भागातील संपर्क अधिक सक्षम झाल्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, दैनंदिन प्रवाशांची सोय वाढेल आणि परिसराच्या राहणीमानात सकारात्मक बदल घडेल. बाणेर आणि बालेवाडीसारख्या भागांतील वाहतूक कोंडी कमी करण्यासही या मार्गिकेची मदत होईल. तसेच पश्चिम पुण्यातील नागरिकांना शिवाजीनगर, डेक्कन, सिव्हिल कोर्ट आणि इतर मध्यवर्ती भागांशी अधिक सहज संपर्क साधता येईल,” असे VTP Realty चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक सचिन भंडारी यांनी सांगितले.

पश्चिम पुण्यात निवासी प्रकल्पांसोबतच किरकोळ विक्री, कार्यालयीन आणि मिश्र-वापर प्रकल्पांमध्येही गुंतवणूक वाढत आहे. पुनावळे आणि मानसारख्या भागांमध्ये अलीकडील प्रकल्प घोषणांमुळे या उदयोन्मुख बाजारपेठांबाबत विकासकांचा वाढता विश्वास स्पष्ट होतो. सुधारत जाणारी पायाभूत सुविधा, सामाजिक सुविधा आणि कनेक्टिव्हिटीमुळे पश्चिम पुण्याचा विकास अधिक व्यापक स्वरूप धारण करत असल्याचे उद्योग क्षेत्राचे मत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button