Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राज्यात मुसळधार पावसाचा कहर; कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather | गेल्या २४ तासांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी संततधार आणि काही भागांत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, बारामती आणि कर्जत शहरातील काही रस्त्यांवर नदीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, ठाणे आणि पुण्यातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस सुरू राहण्याचा इशारा दिला आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील ४ तासांत मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यासह, विविध जिल्ह्यांसाठी अलर्ट जाहीर करण्यात आले आहेत.

हेही वाचा   :    जगात पुन्हा भारताचा डंका ; जपानला मागे टाकत भारत बनला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

अलर्टची स्थिती:

रेड अलर्ट: मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर. या भागांत अतिमुसळधार पाऊस (२४ तासांत २०४ मिमीपेक्षा जास्त) पडण्याची शक्यता.

ऑरेंज अलर्ट: ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जिथे ११५ ते २०४ मिमी पाऊस अपेक्षित आहे.

यलो अलर्ट: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांना यलो अलर्ट, जिथे ६५ ते ११५ मिमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button