TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

MPSC आंदोलनावर नितेश राणेंचे विद्यार्थ्यांना आवाहन; ‘रोहित पवारांनी चर्चेची भूमिका घ्यावी, आपण एकत्रित काम करू’

‘मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक’; रोहित पवार उद्या कदाचित माझ्यासोबत मंत्रिमंडळात असतील, नितेश राणेंचे वक्तव्य

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (MPSC) अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी पुण्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या ठिकाणी राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री सकारात्मक असून, सरकार विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करत असल्याचे राणे यांनी सांगितले. तसेच आमदार रोहित पवार यांनीही चर्चेची भूमिका घ्यावी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारसोबत एकत्रित काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

नितेश राणे म्हणाले की, “विद्यार्थ्यांचे मित्र म्हणून मी येथे भेटायला आलो आहे. राज्याच्या भविष्यासाठी विद्यार्थी म्हणून येथे आलो आहे. त्यामुळे या ठिकाणी राजकीय वक्तव्य किंवा राजकीय टीका करणार नाही. MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार करावा. त्यांच्या कृतीवर त्यांचे भविष्य अवलंबून आहे.”

‘रोहित पवारांनी चर्चेची भूमिका घ्यावी’

रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन सुरू ठेवले आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढण्याची भूमिका त्यांनी घ्यावी, असे राणे यांनी म्हटले. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची भूमिका घेतली आहे. त्याचप्रमाणे रोहित पवार यांनीही चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

“रोहित पवार विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढतात. त्यांनी आंदोलन करावे; मात्र विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये,” असे राणे म्हणाले.

हेही वाचा –  ‘भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी होतील’; विधान परिषद निवडणुकीवर फडणवीसांचा विश्वास, ठाकरे बंधूंवरही निशाणा

‘रोहित पवार उद्या कदाचित माझ्यासोबत मंत्रिमंडळात’

रोहित पवार यांच्याबाबत बोलताना नितेश राणे यांनी त्यांचे कौतुकही केले. “हा राजकारणाचा मंच नाही, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीच आम्ही मंत्रालयात बसतो. रोहित पवार माझे मित्र आहेत. उद्या कदाचित ते माझ्यासोबत मंत्रिमंडळात मंत्रीदेखील असतील. ते चांगल्याला चांगले म्हणतात. आपण विद्यार्थ्यांसाठी एकत्रित काम करू,” असे राणे म्हणाले.

‘व्ही. राधा समिती MPSC सुधारणांवर काम करत आहे’

MPSCमधील सुधारणांसाठी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखालील समिती काम करत असल्याचे राणे यांनी सांगितले. भविष्यात विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीसह परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्याबाबत सरकारकडून काही निर्णय घेण्यात आले आहेत. मात्र, MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून रोहित पवारांच्या नेतृत्वाखालील आंदोलन सुरूच आहे.

“सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यांच्या मनातील अनेक गोष्टी करण्याचे काम सुरू आहे. सरकार म्हणून आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत. विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेली प्रक्रिया राबवू,” असे आश्वासन नितेश राणे यांनी दिले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button