Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘शिक्षण क्षेत्राबाबतची अनास्था अस्वस्थ करणारी’; खासदार सुप्रिया सुळे

Share On

पुणे :  सध्या शिक्षण क्षेत्रावर शासनाची असलेली अनास्था अस्वस्थ करणारी आहे. शासनाकडून शाळांसाठी फारशा कुठल्याच पायाभूत सुविधा मिळत नाहीत. सरकार योजनांचा लाभार्थींना फायदा करत असताना त्याचा गवगवा करतंय हे चांगले नाही, अशी टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळच्या वतीने शिक्षण शिक्षक संवाद आझम कॅम्पस येथे आयोजित करण्यात आला होता. त्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी पदवीधर आमदार सत्यजित तांबे, उपाध्यक्ष अशोक थोरात, विजय गव्हाणे, रवींद्र फडणवीस, अबेदा इनामदार, जागृती धर्माधिकारी, कोंडाजी आव्हाड, विजयराव कोलते, अजित वडगावकर, गणपतराव बालवडकर, विलास पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

हेही वाचा    –    ‘सरकार कुणाचंही असो आठवलेंच मंत्रिपद पक्क’; नितीन गडकरींची मिश्किल प्रतिक्रिया 

शिक्षणात मातृभाषेविषयी प्रेम, अस्मिता, आस्था आणि राज्य व देशाविषयीचा इतिहास असला पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे. संशोधन व महापुरुषांचा खरा इतिहास आज शिक्षणाचा अविभाज्य भाग असावा.शिक्षकांना अशैक्षणिक कामांमध्ये अडकवू नका. त्यांचा पगार, पेन्शन या विषयांना महत्त्व द्यावे, असेही सुळे म्हणाल्या.

महामंडळाच्या राज्य कार्यकारिणीने केलेले ठराव

– पवित्र पोर्टलद्वारे प्रत्यक्ष मुलाखतीतून शिक्षण संस्थांनी नेमावयाच्या शिक्षकाबाबत कार्यक्षम धोरण ठरवावे.

– शिक्षकेतर कर्मचारी आकृतीबंध व भरती सद्यस्थितीबाबत विचार करून शिक्षकेतर भरती ताबडतोब करावी व त्यांचे वेतन नियमाप्रमाणे द्यावे.

– अनुदानाचा पुढील टप्पा शिक्षणमंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे तातडीने द्यावा.

– समूह शाळा, कंत्राटी शिक्षक, कंत्राटी शिक्षकेतर भरती या योजना बंद कराव्यात

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button