ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
कसारा स्टेशनजवळ सिग्नलला एक्स्प्रेस थांबली अन् चक्क! सापाने केला डब्यात प्रवेश
प्रवाशांची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडाली,सापाला मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढण्यात आले

मुंबई : कसारा रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेसमध्ये साप शिरल्यानं प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाल्याची घटना समोर आली आहे. जबलपूर मुंबई गरीब रथ एक्सप्रेसमध्ये घडलेल्या या भयावह घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. जबलपूरहून मुंबईकडे येणारी गरीब रथ एक्सप्रेस रविवारी सकाळच्या सुमारास कसारा रेल्वे स्थानकापूर्वी सिग्नलला उभी होती. यावेळी एका झाडावरून चक्क सापाने एक्सप्रेसच्या एसी डब्यात प्रवेश केला.
यानंतर हा साप बर्थवर चढून आणखी वर जाण्याचा प्रयत्न करत होता. या सापाला पाहून एक्सप्रेस मधल्या प्रवाशांची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडाली. काही प्रवाशांनी याचा व्हिडिओ देखील चित्रित केला. या सापाला मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढण्यात आल्याची माहिती प्रवाशांनी दिली. यामुळे ट्रेनमधील प्रवाशांची मात्र पाचावर धारण बसली होती.





