Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय’; नारायण राणेंची टीका

मुंबई | मनोज जरांगे पाटील पुन्हा आंतराली सराटीत उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टिका केली आहे.

नारायण राणे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना महाराष्‍ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्‍याने आता मर्यादा ओलांडली आहे.

हेही वाचा    –    ‘शिवजयंती उत्साहाने साजरी करतानाच शिवभक्तांना सर्व सुविधा पुरविण्याची चोख व्यवस्था करा’; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे 

माननीय पंतप्रधान जेंव्‍हा महाराष्‍ट्रात येतील त्‍यावेळी जागेवरुन हलून दाखव! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत, असं नारायण राणे यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

दरम्यान, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी सरकारकडे लावून धरली आहे. यातच आता राज्यात अनेक ठिकाणी लाखोंच्या संख्यने मराठा समाजाच्या नोंदी या कुणबी म्हणून सापडल्या आहेत. त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. तर सगेसोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे,असा शब्द सरकारने दिला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button