breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

2024 लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रियंका गांधी सज्ज; काँग्रेस पक्षाकडून खास रणनीती तयार

उत्तर प्रदेशात काँग्रेसला नवी उमेद देण्यासाठी नेत्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न

नवी दिल्ली | 2024 सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीला एक वर्षाचा अवकाश आहे. सर्वच राजकीय पक्षांची 2024 लोकसभा निवडणूकीसाठी कंबर कसली आहे. काँग्रेसकडून मल्लिकार्जून खरगे यांना पक्षाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन नवसंजीवणी देण्याचा प्रयत्न केला आहे.  उत्तरप्रदेशात सर्वाधिक जागा असल्याने दिल्लीकडे जाणारा रस्ता म्हणून संबोधलं जात. त्यातच आता प्रियंका गांधी उत्तरप्रदेशात खास रणनीतीवर काम करणार आहेत.

येत्या मार्च महिन्यामध्ये काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी लखनऊमध्ये रॅली करणार आहेत. सदर रॅलीपुर्वी पक्षाकडून रणनीती आखण्यात आली आहे. काँग्रेस पक्षात नाराज असणाऱ्या नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसला नवी उमेद देण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा करण्यात आली होती. आता काँग्रेसकडून  हाथ से हाथ जोडो अभियानास प्रारंभ करण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ब्रिजलाल खबरी यांच्या माध्यमातून नाराज नेत्यांना पुन्हा पक्षात सक्रीय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ब्रिजलाल खबरी यांनी कानपूरपासून मोहिमेला सुरूवात केली आहे. उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपुर्वी प्रियंका गांधींनी जोरदार प्रचार केला होता. मात्र, याठिकाणी काँग्रेसला चांगली कामगिरी करता आलेली नाही. 2024 लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रियंका गांधी उत्तरप्रदेशात पुन्हा सक्रीय होणार आहेत.

दरम्यान, काँग्रेस पक्षात नाराज नेत्यांना सोबत घेऊन चालण्याची रणनीती आखण्यात आली आहे. हाथ से हाथ जोडो या अभियानाच्या माध्यमातून देशातील तरूण आणि महिलांना जोडण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचं  काँग्रेसचं धोरण आहे. 2024 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीपुर्वी काँग्रेसला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button