‘महाराष्ट्रात चार चाकी वाहनांना टोल नाही’; देवेंद्र फडणवीस यांचा दावा

मुंबई : राज्यातील टोलवाढीवरून मनसे नेते अविनाश जाधव यांनी आमरण उपोषणाचं आंदोलन केलं होतं. या आदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही जी घोषणा केली होती त्यानुसार राज्यातल्या सर्व टोलवर फॉर व्हिलर किंवा छोट्या गाड्यांना आपण टोलमुक्त केले आहे. केवळ व्यावसायिक वाहनांवरच आपण टोल आकारतो, राज्य सरकारकडून आपण पैसे दिलेले आहेत असा दावा त्यांनी केला. त्यामुळे राज्यातील सर्व टोलवर खरेच चारचाकी वाहनांकडून टोल घेतला जात नाही का? असा प्रश्न आता लोकांना पडला आहे.
हेही वाचा – Pimpri-Chinchwad : टँकरमधून गॅस चोरी करताना नऊ टाक्यांचा स्फोट, तीन ते चार बस जळून खाक
टोलमुक्त महाराष्ट्र झाला देखील आणि महाराष्ट्राला कळलं देखील नाही… किती 'भूल'थापा माराल. खरंच राजसाहेबांनी जे नाव ठेवलं होतं ते अगदी चपखल आहे… भाजपकुमार थापाडे ! pic.twitter.com/ikxDCxqY9F
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 8, 2023
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
शिवसेना-भाजपाच्या जाहीरनाम्यात टोलमुक्त महाराष्ट्र करू असं जाहीर केलं होतं. २०१४, २०१७ लाही जाहीर केलं होतं. पण हे प्रश्न त्यांना विचारले जात नाहीत. प्रत्येकवेळी कुठेही गेल्यानंतर टोल आंदोलनावरून मला विचारलं जातं. पण त्याचे रिझल्ट अनेकांना दिसत नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले.





