ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करा’चा संदेश देत सायबर जनजागृती सामूहिक उपक्रम

आळंदी : क्विक हील फाउंडेशन आणि एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (MIT ACSC), आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर वॉरियर्स क्लबच्या माध्यमातून ‘थिंक बिफोर यू ट्रस्ट’ (विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करा) या विषयावर सायबर जनजागृती सामूहिक उपक्रमाचे आयोजन २२ सप्टेंबर रोजी रात्री ७:३० वाजता एमआयटी एसीएससी, आळंदी येथे करण्यात आले.

वाढत्या सायबर फसवणुकीबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि डिजिटल व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा संदेश देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या उपक्रमामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पेमेंटच्या पडताळणीच्या नावाखाली ओटीपी मागून फसवणूक करण्याचा प्रयत्न नाट्यरूप सादरीकरणातून दाखवण्यात आला. एखादी व्यक्ती स्वतःला बँक किंवा शासकीय विभागातून बोलत असल्याचे सांगत असली, तरी कोणतीही गोपनीय माहिती देण्यापूर्वी तिची अधिकृत माध्यमातून पडताळणी करणे आवश्यक असल्याचा संदेश या सादरीकरणातून देण्यात आला.

सादरीकरणामध्ये माधुरी यांनी आजीची, मानसी यांनी आईची आणि गायत्री यांनी मुलीची भूमिका साकारली. सादरीकरणादरम्यान गायत्रीने वेळीच ओटीपी शेअर करण्यापासून कुटुंबाला थांबवून सायबर फसवणूक कशी ओळखावी, याबाबत जागरूक केले.

हेही वाचा –  पुणे विभागात FDA ची मोठी कारवाई; ८४९ आस्थापनांची तपासणी, ४६ हजार किलो संशयित अन्नसाठा जप्त

यानंतर पाच सायबर वॉरियर्सनी ओटीपी फसवणूक, बनावट लिंक, अनोळखी एपीके फाइल, क्यूआर कोड फसवणूक आणि सार्वजनिक वाय-फायचा असुरक्षित वापर याबाबत मार्गदर्शन केले. अनोळखी व्यक्तीला ओटीपी, पिन, पासवर्ड किंवा बँकिंगशी संबंधित माहिती देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, अनोळखी एपीके किंवा फाइल डाउनलोड करू नये आणि क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी त्याची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमातून “घाबरू नका, घाई करू नका, आधी पडताळणी करा आणि मगच विश्वास ठेवा” हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

उपक्रमाच्या शेवटी सायबर वॉरियर्सनी “थांबा! विचार करा! पडताळणी करा! आणि मगच विश्वास ठेवा!” तसेच “जागरूक रहा — सुरक्षित रहा!” असा संदेश देत सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button