ठाकरेंसोबत आमचा साखरपुडा झाला, परंतु लग्नासाठी दोन भटजींचा अडथळा! प्रकाश आंबेडकरांचा टोला

मुंबई : शिवसेना-वंचितच्या युतीबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक सूचक विधान केलं आहे. वंचित बहुजन आघाडीचा शिवसेनेच्या ठाकरे गटाबरोबर साखरपुडा झाला आहे, मात्र, लग्नासाठी दोन भटजींचा अडथळा आहे, असं मिश्किल वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, शिवसेनेबरोबर आमची बोलणी झाली. आता लग्नाची तारीख ठरली पाहिजे. मात्र, दोन भटजींमुळे लग्नाची तारीख ठरवलेली नाही. एक काँग्रेसचा नावाचा भटजी आहे आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा भटजी आहे. हे दोन भटजी जोपर्यंत लग्नाची तारीख ठरवत नाही, तोपर्यंत आमचं लग्न होणार नाही. त्यामुळे आम्ही काय करणार.
हेही वाचा – अविनाश साबळे याने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये पटकावले सुवर्णपदक
आणि, आता ते सीपीआय (एम)चा प्रवक्ता म्हणून वापर करत आहेत!
सीताराम येचुरी यांनी राष्ट्रपतीपदासाठी यूपीएचे उमेदवार म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचे नाव सुचवल्यावर काय झाले होते? काँग्रेसचा प्रतिसाद काय होता ते आता सीताराम येचुरींनी देशाला सांगावे.
बाळासाहेबांची आणि वंचित बहुजन आघाडीची… pic.twitter.com/0lJQLdGU6c— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) October 1, 2023
बाळासाहेबांची आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट होती. दलित विरुद्ध दलित का? व कशासाठी? त्याऐवजी, काँग्रेस आणि डावे पक्ष यांनी आदिवासी उमेदवार राष्ट्रपतीपदासाठी द्यावा, हा ॲड प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव होता. एका वंचित समूहाच्या व्यक्तीला देशाचे सर्वोच्च पद देण्याचे श्रेय यूपीएला मिळू शकले असते, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.




