breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अविनाश साबळे याने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये पटकावले सुवर्णपदक

Asian Games 2023 : महाराष्ट्रातीस बीड जिल्ह्यातील धावपटू अविनाथ साबळे याने आशियाई क्रीडा स्पर्धेत ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. आता भारताच्या खात्यात सुवर्ण पदकांची संख्येत वाढ झाली आहे. सातव्या दिवसाअखेर भारताची पदक संख्या ३८ पर्यंत पोहचली आहे.

मराठमोळ्या अविनाश साबळे याने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने ८:१९:५३ मिनिटे पूर्ण केले. या स्पर्धेतील भारताचे हे १२वे सुवर्णपदक आहे. बॅडमिंटनमध्ये भारताची चीनशी स्पर्धा सुरूच आहे. अंतिम सामन्यात दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत आहेत. शेवटचा सामना जिंकणारा संघच सुवर्ण जिंकेल.

हेही वाचा – वादग्रस्त ठरलेल्या कंत्राटी तहसीलदार नियुक्तीचे आदेश अखेर मागे 

कोण आहे अविनाश साबळे?

अविनाश पहिली ते पाचवीपर्यंत गावातील जिल्हा परिषद शाळेमध्येच शिकला घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळं त्याचे आई-वडील वीटभट्टीवर काम करायचे आणि त्यातही त्यांना तो मदत करायचा. शाळेत जाताना आणि येताना तो धावण्याचा सराव करायचा. त्याच्या याच सर्वामुळे २००५ मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांना पहिला नंबर पटकावला होता. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अविनाशला ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवता आला नसला तरी, स्टीपलचेस प्रकारात जागतिक स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button