Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणाची सखोल चौकशी

आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालविण्याची मागणी

जुन्नर | पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २५ वर्षीय संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, तो रोजंदारीवर काम करणारा मजूर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेची अत्यंत पारदर्शक आणि सखोल चौकशी करून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

“हे कृत्य अत्यंत निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारे आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे,” असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

हेही वाचा

पुढील ५० वर्षांचा विचार करून पुण्याच्या वाहतुकीचे नियोजन करूया; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची विशेष विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणातील तपास निष्पक्ष आणि वेगाने पूर्ण करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. तसेच पीडित कुटुंबाच्या दुःखात शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, तपासातील तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

“हे कृत्य अत्यंत निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारे आहे. प्रकरणाची पारदर्शक आणि सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”

– सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button