Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘२०२४ ला स्वराज्य पक्ष निवडणूक लढवणार’; छत्रपती संभाजीराजे

पुणे : महाराष्ट्रात जे राजकारण सुरू आहे ते आता बघवत नाही, म्हणून येणाऱ्या २०२४ ला स्वराज्य पक्ष निवडणूक लढवणार, असे सूतोवाच माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिले आहेत. मात्र आता या व्यक्तयवरून येणाऱ्या काळात कोणाचं टेंशन वाढणार हे पाहावं लागणार आहे. त्यांनी पुण्यात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी माध्यांशी संवाद साधला.

छत्रपती संभाजी महाराज यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत स्वराज पक्षाची स्थापना झाल्याची माहिती दिली होती. त्यावेळी स्वराज्य हे राजकारणात येण्याची शक्यता दिली होती. मात्र आज त्यांनी २०२४च्या निवडणूक लढणार असा स्वता संभाजी राजे यांनी जाहीर केलं आहे.

संभाजी राजे म्हणाले की, स्वराज्य संघटनेचा सात ते आठ महिन्याचा प्रवास पाहता लोकांची अपेक्षा आहे की, अपल्याला सुसंस्कृत महाराष्ट्र पाहायचं आहे. जे काही महाराष्ट्रत सुरू आहे ते आम्हाला बघवत नाही. म्हणून तुम्ही पुढे येईला पाहिजे, या करिता येणाऱ्या २०२४ ला कुठल्याही परिस्थिती स्वराज्य निवडणूका लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

https://www.facebook.com/YuvrajSambhajiraje/

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button