Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

आंध्र प्रदेशात बस-ट्रकचा भीषण अपघात; १३ ठार, ४ जखमी

कर्नूल – आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील मदारपूर गावाजवळ चालकाचे भरधाव बसवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या बस आणि ट्रकच्या अपघातात १३ जण जागीच ठार झाले. पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील सर्वजण राजस्थानातील अजमेरला जात होते होते. मात्र पहाटे चार वाजताच्या सुमारास कर्नूल जिल्ह्यातील वेलदूर्ती हद्दीत असलेल्या मदरापूर गावाजवळ बसने विरुद्ध दिशेकडून येत असलेल्या ट्रकला धडक दिली. प्राथमिक अंदाजानुसार चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यानंतर बस समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. या भयंकर अपघातात १३ जण जागीच ठार झाले, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मृतांमध्ये महिला आणि बालकांचाही समावेश आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button