Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्ली हिंसाचार: फेसबुक इंडियाच्या उपाध्यक्षांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

Share On

दिल्ली – दिल्ली विधानसभेच्या एका समितीनं द्वेषमूलक मजकूरप्रकरणी फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांना बजावलेल्या नोटिशीला सुप्रीम कोर्टानं बुधवारी स्थगिती दिली. येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत त्यांच्यावर कुठलीही दंडात्मक कारवाई करण्यात येऊ नये असं सांगताना या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ ऑक्टोबर रोजीच होईल असेही सांगितले.

दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात उसळलेल्या दंगलप्रकरणी फेसबुकवर द्वेषमूलक मजकूर प्रसिद्ध झाला होता. याबाबत विधानसभेच्या शांतता आणि एकोपा समितीनं १२ सप्टेंबर रोजी अजित मोहन यांना नोटिस पाठवत समितीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button