तुळशी तलाव भरेल इतका तुंबलेल्या पाण्याचा उपसा, आदित्य ठाकरेंचा दावा

मुंबई | “मुंबईत गेल्या 24 तासात एका तुळशी तलावाइतके म्हणजे जवळपास साडेसहा ते पावणेसात हजार दशलक्ष लीटर इतक्या पाण्याचा उपसा करण्यात आला”, असा दावा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्याचबरोबर दादर आणि धारावी परिसरात अवघ्या 12 तासात तब्बल 332 मिमी पाऊस कोसळला, अशी माहितीदेखील आदित्य ठाकरे यांनी दिली.
मुंबईत गेल्या 24 तासात झालेल्या अतिवृष्टिच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका क्षेत्रातील काही भागांची पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त इक्बाल चहल हेदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. या पाहणीत आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला सखल भागातील पाण्याचा जलद निचरा करण्यासह विविध आवश्यक उपाययोजना करण्याचेही निर्देश दिले.
आदित्य ठाकरे यांनी या पाहणी दौऱ्यानंतर मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षालाही भेट दिली. तिथे त्यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली





