TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी चंद्रपुरात पोलिसांची धडक; १२.६० लाखांचे डीजे साहित्य जप्त

राजुरा शहरात विनापरवाना कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्यांवर कारवाई; दोघांविरोधात गुन्हा दाखल

चंद्रपूर : यंदाच्या गणेशोत्सवात ‘नो डीजे, नो डॉल्बी’चा संदेश देत प्रशासनाकडून ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा दाखला देत गणेशोत्सव पारंपरिक आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांनी विनापरवाना डीजे वाजवणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली.

राजुरा शहरातील नवीन बसस्थानकासमोर विनापरवाना आणि कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बोलेरो पिकअपमधून डीजे वाजवला जात असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी संबंधितांकडे डीजे वाजवण्याचा परवाना मागितला. मात्र, त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले.

यानंतर पोलिसांनी संपूर्ण डीजे साहित्य जप्त केले. या कारवाईत १२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. तसेच रवी एकवणकर आणि सचिन सरोज या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा –  विमल पान मसाला प्रकरणात कंपनीला दिल्ली हायकोर्टाचा धक्का; महाराष्ट्र FDAविरोधातील याचिका फेटाळली

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा

गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना स्पष्ट संदेश मिळाला आहे. आगामी काळात उत्सवादरम्यान कायद्याचे उल्लंघन केल्यास अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासन आणि पोलिसांकडून ‘नो डीजे, नो डॉल्बी’चे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुका पारंपरिक पद्धतीने साजऱ्या करण्यावर प्रशासनाचा भर आहे.

मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशांच्या गजरात उत्सव साजरा करताना ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. सार्वजनिक उत्सवाचा आनंद घेताना नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group