Breaking-newsराष्ट्रिय

कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या नंबरवर

Share On

नवी दिल्ली- कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येबाबतीत आता भारताने ब्राझीललाही मागे टाकलं आहे. आता भारत अमेरिकेनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येच्या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशात विक्रमी 90,632 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 1065 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 5 सप्टेंबर रोजी कोरोनाच्या सर्वाधिक 86,432 केसेस समोर आल्या होत्या. देशात आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या 41 लाखांवर पोहोचलीय तर ब्राझीलमध्ये रुग्णांची संख्या 40 लाखांच्या जवळ आहे.

देशात कोरोना एकूण बाधितांची संख्या आता 41 लाख 13 हजार इतकी झाली आहे. त्यामध्ये आतापर्यंत 70,626 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या आता 8 लाख 62 हजार इतकी झाली असून एकूण 31 लाख 80 हजार रुग्ण बरे झाले आहेत. सक्रिय रुग्णांच्या संख्येशी तुलना करता बरे होणाऱ्यांचे प्रमाण हे तिप्पटीहून जास्त आहे.

आयसीएमआरच्या अहवालानुसार कोरोना संबंधित 54 टक्के केसेस या 18 ते 44 वयोगटातील आहेत तर कोरोनामुळं होणाऱ्या मृत्यूंपैकी 51 टक्के मृत्यू हे 60 वर्षांवरील लोकांचे आहेत. 5 सप्टेंबरपर्यंत देशात जवळपास 4 करोड 88 लाख सँपल टेस्ट केले गेले आहेत. त्यामध्ये बाधितांचे प्रमाण हे 7 टक्क्यांहून कमी आहे.

12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये संक्रमणातून बरे होण्याचा दर हा 77 टक्क्यांहून अधिक आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांपैकी 30 टक्के रुग्ण हे महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन राज्यांतील आहेत. देशात ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनापासून बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे त्यात दिल्ली (89 टक्के), बिहार (88टक्के), तामिळनाडू (86टक्के), पश्चिम बंगाल (83टक्के), राजस्थान (82टक्के), गुजरात (81टक्के) यांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button