Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्यात 15 सप्टेंबरपासून “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” मोहीम राबवणार : मुख्यमंत्री
मुंबई | चेस दी व्हायरस मोहिमेमुळे आपण या साथीला चांगले रोखले. पूर्वी झोपडपट्टी व वसाहतीत वाढलेला प्रादुर्भाव आता उंच इमारती, मोठ्या सोसायट्या आणि उच्चभ्रू वस्तीत मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. 80 ते 85 टक्के रुग्ण या भागातून आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही राज्यस्तरीय मोहीम राबवित असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
मुंबईत ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे यांची मदत घ्या, त्यांना सहभागी करून घ्या, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महानगरपालिका वॉर्ड अधिकारी, उपायुक्त, वैद्यकीय अधीक्षक, अधिष्ठाता यांच्यासोबत आज बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला विविध सूचना दिल्या आहेत.





