Breaking-newsताज्या घडामोडी

‘एकनाथ खडसे यांनी शिवसेनेत यावं’, अब्दुल सत्तार यांची खुली ऑफर

औरंगाबाद | शिवसेनेचे नेते आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांना शिवसेनेत सामील होण्याची ऑफर दिली आहे. त्यांनी एकनाथ खडसे यांना बाहुबलीची उपमा दिली आहे. “कटप्पाने बाहुबलीला का मारले? हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे खडसे यांचं काय झालं ते नव्याने सांगायला नको. त्यांनी भाजप सोडून आता शिवसेनेत यायला हवं. आम्ही त्यांचे स्वागत करु”, असं अब्दुल सत्तार म्हणाले .

“एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये खरंच अन्याय झाला आहे. त्यामुळेच शिवसेना आणि भाजपची युती तुटली. आता खडसेंनी आमच्याकडे यावं. हवं तर मी मध्यस्ती करेन. त्यांच्यासारख्या नेत्याची शिवसेनेलाही मदत होईल”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

“एकनाथ खडसे कधीही संपणार नाहीत. राजकारणात एखादा अपघात होतो आणि त्या अपघाताने एखादा माणूस मागे पडतो. मात्र खडसे यांच्यावर भाजपमध्ये खरंच अन्याय झाला आहे. त्यांचं भवितव्य चांगलं आहे. त्यांनी शिवसेनेत यावं. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांच्याबाबत निश्चित बोलू”, असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button