breaking-newsक्रिडा

2020चा आशिया चषक पाकिस्तानात होणार

दुबई – 2020 साली होणाऱ्या आशिया चषकाचे यजमानपद आशियाई क्रिकेट परिषदेने पाकिस्तानला दिले आहे. मात्र ही स्पर्धा पाकिस्तानात होणार की युएईमध्ये हे अजुन स्पष्ट झालेले नाही. बांगलादेशात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

दरम्यान, जर हि स्पर्धा पाकिस्तानात झाली तर, भारत या स्पर्धेत सहभागी होणार की नाही याचा निर्णय अद्याप बीसीसीआयने घेतलेला नाहीये. स्पर्धेचे यजमानपद हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला देण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धा कुठे भरवायची हा त्यांचा निर्णय आहे.

आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष नझमुल हसन यांनी एका वृत्तपत्राशी बोलत असताना ही माहिती दिली आहे. 2020 साली होणाऱ्या टी-20 विश्‍वचषकासाठी ही स्पर्धा टी-20 स्वरुपात खेळवली जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button